नंदुरबार| प्रतिनिधी
नंदुरबार-रनाळा रस्त्यावरील पेट्रोल पंपजवळ रेशनींगच धान्य अवैधरित्या वाहतुक करतांना मिळून आल्याने सव्वादोन लाखाचा मुद्देमाल जप्त करत एकाविरूध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार-रनाळा रस्त्यावर पेट्रोल पंपाजवळ हुसेन शेख हा त्याच्या ताब्यातील मिनी टेम्पो (क्र.एम.एच.०३-सी.पी.४९०१) हिच्यातून रेशनींगचे धान्य अवैधरित्या वाहतुक करतांना पुरवठा निरीक्षक यांना आढळून आला.
त्याच्या ताब्यातून ३ हजार २८० रूपये किंमतीचे दोन क्विंटल गहू व ९.७ क्विंटल तांदुळ यासह दोन लाख रूपये किंमतीची मिनीट्रेम्पो जप्त पुरवठा निरीक्षक श्रीमती रामकवर किसनराव चौरे यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात हुसेन आजीम शेख रा.रनाळा.(ता.नंदुरबार) याच्याविरूध्द जिवनावश्यक वस्तु कायदा १५५ चे कलम व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर करीत आहेत.








