खापर l प्रतिनिधी
दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा जाणवत आहे त्यामुळे सामाजिक उत्तरदायित्व
राखत सामाजिक उपक्रमांतर्गत २६ डिसेंबर रोजी अक्कलकुवा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन जामीया संस्थेचे अध्यक्ष मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानवी व मौलाना हुझैफा वस्तानवी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गावित , संस्थेचे सचिव हाफिज सुलेमान वस्तानवी,मौलाना औवेस वस्तानवी , शेख अखलाख,मौलावी जावेद बोडखा,डॉ. गुफरान अहमद आदी उपस्थित होते.

जामीयाच्या दारूल हदीसच्या सभागृहात संपन्न झालेल्या रक्तदान शिबिरात एकुण २३० दात्यांनी स्वच्छेने रक्तदान केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मौलाना गुलाम वस्तानवी म्हणाले की, जगात रक्तदानासारखे सर्वश्रेष्ठ दान कोणतेच नाही.त्यामुळे सर्वांनी रक्तदान करुन समाजात एक वेगळा
आदर्श निर्माण करावा.
रक्तदान शिबीराच्या यशस्वीतेसाठी आई.आई. एम.एस.आर.नूर हॉस्पिटल बदनापुर चे सी.ई.ओ.डॉ.इल्यास बेमात आणि मेडिकल सुपेरिन्टेंडेंट डॉ.इशरत जहाँ यांनी ब्लड बँकेचे १६ कर्मचारी यांची टीम जामीया अक्कलकुवा येथे पाठवली होती. जमियाच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने रक्तदान करून शिबिर यशस्वी केले.








