नंदुरबार l प्रतिनिधी
शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना शाखा शहादा जि.नंदुरबारतर्फे सामाजिक उपक्रम भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन म्युन्सिपल विद्यालय शहादा येथे आयोजित करण्यात आले होते. रक्तदान शिबिराला अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा दिशा समिती सदस्य डॉ. कांतीलाल टाटीया उपस्थित होते.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक ३६० गिनिज बुक रेकॉर्ड एव्हरेस्टवीर अनिल वसावे यांच्या हस्ते करण्यात आले.भव्य रक्तदान शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून शहादा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती उषा पेंढारकर, सुनील तावडे शिक्षण विस्तार अधिकारी , शहादा,विरसिंग ठाकरे पंचायत समिती सदस्य,एम.एस. सोनार प्राचार्य म्युनिसिपल शहादा , पत्रकार संजय पाटील , प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत,जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई,अक्कलकुवा तालुक्याचे प्रसिद्धीप्रमुख केश्वर वसावे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहून मार्गदर्शन केले.सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन व सरस्वती प्रतिमेचे पूजन झाले. त्यानंतर एव्हरेस्टवीर आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे यांचाही सत्कार शाल, श्रीफळ,गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.व शिक्षक दिनाबद्दल मार्गदर्शन मान्यवर यांनी केले. मान्यवरांनी रक्तदान याचे महत्व व विद्यादान सोबतच रक्तदान करत शिक्षकांनी समाजाप्रती करत असलेल्या कार्याबद्दल सर्व शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.त्यानंतर प्रत्यक्ष रक्तदान शिबिराचे उद्घाटन अनिल वसावे यांचे हस्ते करण्यात आले. रक्तदान शिबिराला सर्व शिक्षक बंधूनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत दिवसभरात एकूण ३१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदानासाठी खलील काजी, श्री.जैन यांच्या नेतृत्वाखाली जनकल्याण ब्लड बँक नंदुरबार यांनी व यांच्या टीमने मेहनत घेतली. प्रहार शिक्षक संघटनेने केलेल्या कार्याचा आढावा कार्याचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.शिबीराप्रसंगी डॉ. कांतिलाल टाटिया यांनी रक्तदान हे श्रेष्ठदान आहे.जाती धर्माच्या पलीकडे जाऊन एका मानवाचे रक्त दुसऱ्या गरजू मानवाला दिले जाते आजच्या युगात सर्वश्रेष्ठ दान मानले जाते.मानवी रक्ताला कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने रक्तदान करणे हा एकमेव पर्याय समाजापुढे आहे.रक्तदान म्हणजेच श्रेष्ठदान कुणाचा जीव वाचवण्यात खरं पुन्य आपल्याला लाभले हीच सामाजिक बांधिलकी आपल्या मनात जागवूया रक्तदान करून संकल्पनेतून मोठ्या संख्येने शिक्षकांनी रक्तदान केलेत.कोरोणा महामारीत निर्माण झालेल्या रक्ताचा प्रचंड तुटवडा भरून काढण्यासाठी त्याचप्रमाणे आगामी काळात कोणत्याही गरजू रुग्णाला रक्त दान दिले तर पुण्याचे कार्य करणार आहेत.अर्थातच एकीकडे कोरोना १९ वेळची महामारी त्यातच या महामारीच्या काळात जिल्ह्यात रक्ताची तीव्र समस्या होऊ शकते. प्रहार शिक्षक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम रक्तदान उपक्रमाचे स्वागत नक्कीच उल्लेखनीय,गौरवास्पद आहे असे मत डॉ.कांतिलाल टाटिया यांनी व्यक्त केले.रक्तदान शिबिराचे सूत्रसंचालन जयवंत जोशी यांनी केले.तर उपस्थितांचे आभार मन्मथ बरडे यांनी केले.भव्य रक्तदान शिबीर आयोजनासाठी प्रहार शिक्षक संघटना शाखा शहादाचे तालुकाध्यक्ष तुकाराम अलट व प्रहार शिक्षक संघटना शहादा संपूर्ण कार्यकारणी शिक्षक बांधवांनी सहकार्य केले. रक्तदान करणाऱ्या शिक्षक बांधवांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.तसेच जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.