तळोदा l प्रतिनिधी
तळोदा प्रकल्पात चालविण्यात येणारी धडगाव तालुक्यातील आहेत. सुदैवाने पोळा सणानिमित्त शाळेला सुट्टी असल्यामुळे मुले गावाला गेली होती. साहजिकच पुढील अनर्थ टळला परंतु प्रशासनाने आता दुरुस्तीसाठी तातडीने कार्यवाही हाती घ्यावी अशी पालकांची मागणी आहे.
तळोदा येथील आदिवासी विकास प्रकल्पमार्फत धडगाव तालुक्यातील हातधुई येथे आदिवासी मुला मुलींसाठी निवासी शासकीय आश्रमशाळा चालवली जात असते या शाळेची इमारत पारंपरिक पद्धतीची बनवली असल्यामुळे पत्रे बसविण्यात आली आहे. शाळेत इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत वर्ग आहे. त्यामुळे तेथे साडेतीनशे पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत काल मंगळवारी रात्री झालेल्या प्रचंड वारी वादल्यासह आलेल्या मुसळधार पावसाने विद्यार्थ्यांच्या निवासाचे व सभागृहाचे पत्रे उडाली होती वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे पत्रे लांब पर्यंत उडाली होती सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. कारण विद्यार्थी पोळ्या मुळे आपापल्या गावी गेले होते याशिवाय आजूबाजूचे विद्यार्थी नव्हते त्यामुळे पुढील अनर्थ टळला होता या प्रकरणी मुख्याध्यापक सायसिंग वसावे यांनी प्रकल्प प्रशासनाला शाळेत घडलेल्या घटनेच्या अहवाल दिला आहे. असे प्रकल्पाच्या सूत्राने सांगितले असून तेथील चौकशीसाठी शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना शाळेत पाठवल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
इमारतीचीही झाली दुरावस्था
ज्या इमारतीची पत्रे उडाली आहेत तिचीही अत्यंत दुरावस्था झालेली आहे.कारण त्या इमारतीच्या भिंतीला मोठं मोठे तडे गेले आहेत त्याशिवाय ठिकठिकाणी प्लास्टर देखील उघडलेले आहे. शिवाय खिडक्या व त्याचे तावदाने ही तुटलेली आहेत. त्यामुळे या इमारतीची दुरुस्ती हाती घेण्याची गरज आहे. मात्र तसे होतांना दिसुन नाही वास्तविक प्रकल्पाकडे मोठा निधी आहे. सहाजिकच शासकीय आश्रमशाळाच्या जीर्ण इमारतींची दुरुस्ती होणे ही गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनाने दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्याची पालकांची मागणी आहे.