नंदुरबार
शहरातील शांती नगरात दारुच्या नशेत मुलाला मारहाण केल्याप्रकरणी वडीलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील शांती नगराील भाऊसाहेब बळीराम पाटील यांनी दारुच्या नशेत पत्नी अर्चना भाऊसाहेब पाटील यांच्याशी वाद घालत शिवीगाळ करीत होता. यावेळी अर्चना पाटील यांनी शिवीगाळ करु नका असे सांगितले. याचा राग आल्याने भाऊसाहेब पाटील यांनी कंबरेचा पट्टा काढून अर्चना पाटील यांना मारहाण करण्यासाठी आला.
यावेळी मुलगा मनिषकुमार वाचविण्यासाठी गेला असता भाऊसाहेब पाटील याने मुलगा मनिषकुमार यास पट्ट्याने मारहाण केली. तसेच पाण्याने भरलेल्या कळशी व हाताबुक्यांनी मारहाण केली. याबाबत अर्चना पाटील यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात भाऊसाहेब पाटील याच्याविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.कैलास सोनवणे करीत आहेत.








