नंदुरबार l
शहरातील होळतर्फे हवेली येथील घरातून चोरट्याने १६ हजाराची रोकड व ३ हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा १९ हजाराचा मुद्देमाल चोरुन नेला.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील होळतर्फे हवेली येथील राजेश बादल देसाई यांंच्या घरात चोरट्याने प्रवेश करुन १६ हजाराची रोकड व ३ हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण १९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. याबाबत राजेश देसाई यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.भटू धनगर करीत आहेत.








