नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मीनल करनवाल यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे.
नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे हे महिनाभराच्या प्रशिक्षणासाठी गेल्याने त्यांचा पदभार प्रांताधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी मिनल करनवाल यांच्याकडे देण्यात आला आहे. तसे पत्र नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जिल्हा परिषदेला दिले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे हे महसूल प्रशिक्षणासाठी १४ जानेवारीपर्यंत मसुरी येथे गेले आहेत . १६ जानेवारी रोजी ते पदभार स्वीकारणार आहेत .
या कालावधीत त्यांचा पदभार हा प्रांताधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल या सांभाळतील. त्यांनी सोमवारी पदभार स्वीकारला आहे.








