नंदुरबार l प्रतिनिधी
“स्वच्छ जल से सुरक्षा “ या अभियान अंतर्गत नंदुरबार पंचायत समितीच्या सभागृहात एक दिवशीय तालुकास्तरीय प्रशिक्षण घेण्यात आले .प्रशिक्षणाचे उद्घाटन प्रकल्प संचालक (जल जीवन मिशन) तथा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी जयवंत उगले यांच्या हस्ते करण्यात आले .
जिल्ह्यात दि. १ डिसेंबर ते ३१डिसेंबर २०२२ या कालावधीत स्वच्छ जल से सुरक्षा हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील सर्व स्त्रोतांचे व नळ पाणी पुरवठा योजनांच्या अस्तित्वातील सर्व स्रोतांचे जिओ टॅगींग,पाणी गुणवत्ता परीक्षण, मान्सून पश्चात पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे पाणी गुणवत्ता परीक्षण, ग्रामस्तरावर ग्रामसेवक,आरोग्य सेवक ,जलसुरक्षक,गाव स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या महीलां मार्फत पाणी नमुने गोळा करणे,
पाणी नमुन्यांची रासायनिक व जैविक तपासणी करणे व त्याची माहिती संकेतस्थळावर अद्यावत करणे.तसेच एफ टी के किटची उपलब्धता,ग्रामपंचायतनिहाय प्रा.आ.केंद्र स्तरावरिल ,व त्याद्वारे पाणी गुणवत्ता तपासणी पुर्ण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व ग्रामसेवक , आरोग्य सेवक , डाटा एन्ट्री ऑपरेटर , जसुरक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आले .
मुख्य प्रशिक्षक म्हणून जिल्हा कक्षातील पाणी गुणवत्ता सल्लागार नितीन पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले . यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी सुवर्णा पवार , विस्तार अधिकारी बि.डी.निकुंभ, ए.के. बिराड , एन.जी.पाटील , सागर राजपुत , जे .एस . पवार तालुक्यातील ग्रामसेवक, आरोग्य सेवक, (Mpw, )जलसुरक्षक ,डेटा इन्ट्री, ऑपरेटर उपस्थित होते .








