सारंगखेडा l
सारंगखेडा (ता. शहादा)येथे चेतक फेस्टिवल मध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय अश्वचित्र शिल्प स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.त्यात अशोक शिंपी (नगरदेवळा)यांनी प्रथम क्रमांक मिळविला असून त्यांना ५१ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
राष्ट्रीय अश्व चित्र स्पर्धेत २० राज्यातून एकूण ८०० चित्रांचा सहभाग होता त्यापैकी अंतिम स्पर्धेसाठी व प्रदर्शनासाठी २५० चित्रांची निवड करण्यात आली होती. त्या चित्रांचे परीक्षण मुंबई येथील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे प्रा.गजानन शेपाळ व नागपूर येथील प्रा.हेमंत सूर्यवंशी यांनी केले.
स्पर्धेचा निकाल असा.
निलेश अशोक शिंपी,नगरदेवळा(प्रथम,५१ हजार ₹ पारितोषिक),
राखी अग्रवाल,पुणे(द्वितीय,३१ हजार रुपये), भरत दास, पश्चिम बंगाल ( तृतीय,२१ हजार रुपये),
नुसरत जहाँ रियाजोद्दीन,चोपडा (विशेष चित्र पुरस्कार,१० हजार),

विशेष शिल्प पुरस्कार रु.१००००/-चे नंदकिशोर पाटील, सावदा (विशेष शिल्प पुरस्कार,१०हजार)
तसेच पाच हजारांचे ज्युरी अवार्ड हे अंजली मुजुमदार,(हरियाणा)दिपक पाटील, (सोलापूर), सोनाली पोवार (कोल्हापूर),पल्लवी पाटील (हैदराबाद),योगेश पाटील (मुंबई),सुरज शेलार(सिंधुदुर्ग), नंदकिशोर खेडकर, सचिन काळे (नाशिक) वैभव गायकवाड(नाशिक),
शंकर आर. सोनवणे(मुंबई), शाहरुख पिंजारी (कोळदा नंदुरबार), दिव्या जैन (पाचोरा ) ह्या सर्व पारितोषिक प्राप्त विजेत्यांचे चेतक फेस्टिव्हलचे अध्यक्ष जयपाल सिंह रावल यांनी अभिनंदन केले.
८० बाय १५० फुटाच्या या प्रशस्त गॅलरीला भारतातील ज्येष्ठ चित्रकार दत्तात्रय पाडेकर यांनीही भेट दिली. तसेच यावेळी चोपडा येथील ललित कला केंद्राचे प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी चित्रमूल्ये, चित्र कसे पाहावे वाचावे यावर संबोधन केले. परिसरातील कलारसिकांना भारतभरातील विविध कलावंतांच्या कलाकृती पाहण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल चेतक फेस्टिवल कमिटीचेही त्यांनी आभार मानले. या चित्रप्रदर्शनामुळे भविष्यात अनेक कलावंत निर्माण होतील अशी आशा ही व्यक्त केली. चेतक फेस्टिवल हा अश्वकलेसोबत ललित कलांचा कलामहोत्सव असल्याचेही त्यांनी नमूद केले. या स्पर्धेचे संपूर्ण नियोजन आदर्श हायस्कूल,लंगडी (ता. शहादा) येथील कलाशिक्षक चतुर्भूज शिंदे यांनी पाहिले.








