नंदुरबार l
येथील नंदुरबार तालुका विधाय समिती संचलित विधी महाविद्यालयात माहिती अधिकार अधिनियम २००५ या विषयावर कार्यशाळा झाली.
यावेळी संस्था संचालित सर्व शाखांच्या शाखाप्रमुखांसाठी माहिती अधिकार अधिनियम २००५ या विषयावर कार्यशाळा झाली. कार्यशाळेत विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.डी.चौधरी यांनी माहिती अधिकार अधिनियम २००५ अस्तित्वात आल्याची पार्श्वभूमी तसेच सदर कायद्यात आजपर्यंत झालेले बदल, कायद्याची सद्यस्थिती, कायद्याचा होणारा सदुपयोग – दुरुपयोग याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यालय अधीक्षक प्राचार्य पुष्पेन्द्र रघुवंशी, जी.टी.पी.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेंद्र रघुवंशी, बी.एड.कॉलेजचे प्राचार्य डॉ.मुकेश रघुवंशी, औषध निर्माणशास्त्र महाविद्यषालयाच्या प्राचार्या श्रीमती वैशाली शेवाळे यांच्यासह संस्थेतील सर्व प्राथमिक, माध्यमिक, आश्रमशाळा, छात्रालय विभागाचे ६५ शाखाप्रमुख उपस्थित होते. शाखाप्रमुखांनी दैनंदिन कामकाजात माहिती अधिकार कायद्याविषयी आलेले अनुभव, अडचणी मांडल्या. त्यावर प्राचार्य डॉ.एन.डी.चौधरी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राचार्य श्री पुष्पेंद्र रघुवंशी यांनी केले.








