नंदुरबार l
येथील जिजामाता नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी राऊ दिलीपराव मोरे तर व्हा.चेअरमनपदी कैलासचंद्र बनवारीलाल अग्रवाल यांच्या सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
जिजामाता नागरी सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा सोमवार दि.१९ डिसेंबर २०२२ रोजी पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा होवून नुतन कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यात संस्थेच्या चेअरमनपदी राऊ मोरे, व्हा.चेअरमनपदी कैलासचंद्र अग्रवाल यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. संचालकपदी विजय मराठे, रविंद्र वसावे, लक्ष्मण मोरे, दिलीप मराठे, रेणुकाबाई अहिरे, सिताराम वैदू, अनिता मोरे, शारदाबाई अग्रवाल, आशाबाई पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक कार्यालयाचे प्राधिकृत अधिकारी तथा सहअधिकारी संजय कुलकर्णी यांची काम पाहिले. संस्थेच्या माध्यमातून सहाय्यकारी योजना राजवून सामान्य माणसाला न्याय देण्यात येईल. तसेच संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांना सोबत घेवून काम केले जाईल, असे आश्वासन यावेळी नुतन चेअरमन राऊ मोरे यांनी दिले.








