नंदुरबार | प्रतिनिधी
कृषि उत्पन्न बाजार समिती, नंदुरबार अंतर्गत कापुस खरेदी केंद्र, पळाशी येथे भारतीय कपास निगम (सी.सी.आय.) मार्फत कापुस खरेदी शुभारंभ आज सोमवार रोजी केंद्रप्रभारी गणेश सोनुणे यांच्या हस्ते करण्यात आले
पळाशी येथील कापुस केंद्रात १३० वाहनांमधुन कापुस विक्रीस आला व साधारणतः १००० क्विंटल कापुस आवक विक्रीस आला होता. चांगल्या प्रतीच्या कापसाला ८ ह्जार २५० ते ८४००/- पर्यंत दर सीसीआय मार्फत देण्यात आला. शेतकरी बांधवांनी आपला कापुस स्वच्छ व कोरडा करून विक्रीस आणावा तसेच भारतीय कपास निगम (सीसीआय) मार्फत खरेदी केलेल्या कापसाचे चुकारे संबंधित शेतकरी यांचे बँक खात्यावर कुठलीही कपात न करता ३ ते ४ दिवसात जमा होणार असून शेतकरी बांधवांनी चांगल्या प्रतीचा कापुस परस्पर विक्री न करता बाजार समितीचे अधिकृत केंद्रावर विक्री करावा असे आवाहन केंद्रप्रभारी गणेश सोनुणे यांनी केले आहे.
त्याप्रसंगी भारतीय कपास निगमचे (सी.सी.आय.) प्रतिनिधी, के.एल.बघेल व मंगेश किटुकले तसेच परवानाधारक खरेदीदार अशोक चौधरी, गोविंद अग्रवाल, प्रकाश अग्रवाल, शिरिष अग्रवाल, सतीश चौधरी तसेच बाजार समितीचे कर्मचारी जितेंद्र पाटील व कालुसिंग वळवी आदी उपस्थित होते.








