नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील गवळीवाडा भागातील रहिवासी कुणाल भरत चौधरी याची जागतिक स्तरावरील अमेरीका येथे मर्चंट नेव्ही मध्ये अभियंता पदावर स्तुत्य निवड झाली आहे.लवकरच अमेरिका देशातील कॅलिफोर्निया येथे कुणाल चौधरी कर्तव्यावर रुजू होणार आहे.
गेल्या चार वर्षापासून पुणे येथील प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कुणाल चौधरी याची निवड करण्यात आली आहे. तो नंदुरबार येथील नारायण चौधरी यांचा नातू आणि भरत चौधरी यांचा चिरंजीव आहे.त्याला आई-वडील आजी-आजोबा यांचे मार्गदर्शन लाभले.कुणाल चौधरी याच्या यशस्वी निवडीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.








