नंदुरबार | प्रतिनिधी
महिला व बाल विकास विभाग मार्फत १२ व १३ डिसेम्बर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या चाचा नेहरू बाल महोत्सवात् एस. ए. मिशन हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार येथील विद्यार्थ्यांनी घवघवित यश संपादन केले.
सदर बाल महोत्सवत विविध कला व् क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते,यामध्ये विद्यालयाच्या जवळपास १०५ विद्यार्थ्यांनी यशस्वी सहभाग नोंदवीला.
मैदानी क्रीडा प्रकार
१०० मीटर धावणे मुले १७ ० प्रथम ईश्वर धरमसिंग वसावे, द्वितीय प्रणव विलास गावित, १०० मीटर धावणे मुली प्रथम भाग्यश्री सुरेश मराठे , गोळा फेक मुले -१७ प्रथम प्रणव विलास गावित, द्वितीय सनी संजय दबडे, गोळा फेक मुली १७ प्रथम प्राची दिलवरसिंग वळवी, हलीना अनेश वळवी, द्वितीय सुष्मिता पांडुरंग वळवी, ४ बाय १०० रिले मुली १७-द्वितीय भाग्यश्री मराठे अंजली, संतोष पवार, दिव्या वळवी, पलक मिश्रा, ४ बाय १०० रिले मुले प्रथम-ईश्वर वसावे , जितेंद्र पाडवी ,प्रणव गावित,सनी दबडे, ४ बाय १०० रिले मुले द्वितीय- दीपक राठोड, चैतन्य पाटील, जयेश चौधरी ,अभिजीत चव्हाण या खेळाडूंनी यश मिळवले.
तर चित्रकला स्पर्धेत मोठ्या गटात मुलींमध्ये प्रथम क्रमांक रोशनी प्रभू पवार तर संस्कृतिक कार्यक्रमात समूह गीत गायनात लहान गटात विद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. सदर विद्यार्थ्यांना विद्यालयातील क्रीडा शिक्षक मिनल वळवी, सतिष सदाराव, शारदा पाटील,खुशाल शर्मा व संगीत शिक्षक प्रसाद दीक्षित यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ.राजेश वळवी, चेअरमन.रेव्ह.जे.एच. पठारे,विद्यालयाचा प्राचार्य नूतनवर्षा वळवी, उपमुख्याध्यापक विजय पवार,पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा, पर्यवेक्षक मिनल वळवी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.