नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरातील प्रभाग क्र ७ चे भाजपचे नगरसेवक महेंद्र दुसाणे यांच्या मार्फत महा ई-सेवा शिबीर आयोजन नवीन महादेव मंदीरा जवळ करण्यात आले होते या शिबिराचे उध्दघाटन युवा कार्यकरता धनंजय भरत गावीत यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पाटीचे जिल्हासरचिटणीस राजेंद्र गावीत,शहर प्रभारी रमला राणा,तालुका उपाध्यक्ष जितेंद्र अहिरे,जयंती अग्रवाल,किरण टिभे,शहर सरचिटणीस अजय गावीत,निलेश प्रजापत,दर्शन पाटील,घनशाम परमार,जयवंत जाधव,संदिप पाटील,राहुल मराठे,मयुर पाटील,जिग्नेश पाटील,अक्षय जयस्वाल,सौरव भामरे,सोनु चौधरी,भिमसिंग पाडवी,राहुल सिरसाठ,दुर्गा वसावे आदी पधिकारी उपस्थित होते या शिबिरात ई- श्रम कार्ड, मतदान कार्ड, आयुष्मान कार्ड,अभा कार्ड,लाईट बिल अभ्योदय योजन, नवीन करेक्ट योजना हे सर्व कामे मोफत करुन देण्यात आले आहे.
या शिबिरात असंख्य नवापूर शहरातील नागरीकांनी यांच्या लाभ घेतला आहे.यावेळी उपस्थित मान्यवराची सत्कार नगरसेवक महेंद्र दुसाने, यांनी केला.या प्रसंगी भाजप चे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावीत यांनी या मोफत महा ई-शिबिरात लागणारे कागतपञा बद्दल नागरीकांना माहीती दिली.








