म्हसावद प्रतिनिधी
पारंपरिक विरोधी राष्ट्र असलेल्या शेजारील पाकिस्तान च्या विदेश मंत्री बिलावल भुट्टो याने भारत देशाच्या प्रधान मंत्री विषयी अपशब्द चा उपयोग केल्याने सध्या देश भरात संताप व्यक्त करण्यात येत आहे
अधिक वृत्त असे की यु.ऐन.एस. सी च्या अमेरील येथे होत असलेल्या बैठकीत भारत हा शेजारील देशाला तोंडघशी पाडत असल्याने जगासमोर उघडे पडुलगल्याने पाकिस्तान चे तोंडाळ विदेश मंत्री बिलावल भुट्टो यांनी प्रसार माध्यमावर भारताच्या प्रधानमंत्री विषयी अपशब्द उचारल्याने देशभरात संताप व्यक्त केला जातोय त्या पार्श्वभूमीवर शहादा तालुका भारतीय जनता पार्टी च्या वतीने खेडदिगर येथे बिलावल भुट्टो यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा देऊन पुतळ्याचे दहन करण्यात आले.
यावेळी भाजप शहादा तालुका कार्याध्यक्ष डॉ.किशोर पाटील,खेडदिगर सरपंच गणेश कोळी,युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रमाशंकर माळी, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. कपिल जयस्वाल, तालुका उपाध्यक्ष बालू पाटील,हिम्मतसिंग गिरासे,सुनील पवार,ग्रा.स.पंकज भोई,प्रवीण ठाकरे,योगेश पाटील,सरपंच नवनाथ वाघ,सुभाष वाघ,हरिहर माळी,गोपाल पवार,प्रदीप ठाकरे,देवा महाजन,प्रदीप ठाकरे,पंकज महाजन,दीनेश,विजय मुसळदे,मुकेश रामोळे,साईनाथ ठाकरे,गोलू रामोळे,दिनेश सोनवणे,शुभम रामोळे,गोपाल महाजन जितू पाटील आदी उपस्थित होते.








