म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथील ग्रुप ग्रामपंचायत ची सार्वत्रिक निवडणूक ही आज शांततेत पार पडली असुन एकुन ७३ टक्के मतदान झाले.
शहादा तालुक्यातील म्हसावद येथील ग्रुप ग्रामपंचायत गावात एकूण ६ हजार ५६२ मतदार आहेत.त्यात वार्ड क्र.१ येथे १ हजार ६२ पैकी ८५१,वार्ड क्र.२ येथे १ हजार ३१३ पैकी ९३२,वार्ड क्र.३ येथे ८२१ पैकी ६४९,वार्ड क्र.४ येथे १ हजार १०३ पैकी ७५६,वार्ड क्र.५ येथे १ हजार २३२ पैकी ९२४,वार्ड क्र.६ येथे १ हजार ३१ पैकी ६८८ असे एकूण ६ हजार ५६२ पैकी ४ हजार ८०० एवढे मतदान झाले.यात एकूण टक्केवारी ७३.१४, टक्के झाले.येथील ग्रुप ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूकीचे मतदान साठी एकूण सहा बूथ होते.
ते येथील जि.प.कन्या शाळेत,जि. प.मराठी शाळा, कुबेर हायस्कुल व सती गोदावरी माता कन्या विद्यालय येथे आयोजित करण्यात आले होते.गावात शांततेत मतदान झाले गावात अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून शहादा उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे,म्हसावद पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार,शहादा चे पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील,पोलीस कर्मचारी,होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.सकाळ ७ .३० वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली मात्र सकाळी एवढी गर्दी नव्हती पण दुपारी १२ नंतर प्रत्येक बूथ वर गर्दी दिसू लागली होती.








