सारंगखेडा l
येथील चेतक फेस्टिव्हलमध्ये अश्व स्पर्धा सुरु आहेत . रविवारी अश्वनृत्य स्पर्धेत अश्वाच्यां पदलालित्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. अश्वाच्या विविध नृत्यासह चित्तथरारक कसरती सादर करण्यात आल्या .राजस्थानहून आलेला शाहरुख या अश्वनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावीला आहे.

सारंगखेडा येथील यात्रेनिमित्त यावर्षी विविध कला प्रकार सादर होत आहेत . त्यात विविध नृत्य स्पर्धेचा बोलबाला नेहमीच असतो . चेतक फेस्टिव्हलमध्ये होत असलेल्या स्पर्धेत युवकांच्या नृत्य स्पर्धा सुरु आहेत . रात्री उशिरा पर्यंत या स्पर्धा सुरु होत्या .स्पर्धा पाहणार्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले .
यात्रेत विक्रमी गर्दी
यात्रोत्सवाला ८ डिसेंबरपासून सुरू झाली आहे .१५ दिवसांपासून सुरू असलेल्या या यात्रेत गर्दी कायम आहे . अजून एक आठवडा सुरु राहील . रविवारी प्रचंड गर्दी होती .३ तास वाहतूक टप्प झाली होती .रात्री उशिरा पर्यंत वाहतूक विस्कळीत होती . यात्रा स्थळात पोलीस यंत्रणा कमकुवत ठरली . अनेक छेडखानीचे प्रकार व चोरीचे प्रकार दिसून आले . जिल्हयात ठिकठिकाणी ग्रामपंचायत निवडणूकीचे मतदान असल्यामुळे यात्रा स्थळावरील पोलीस बंदोबस्त काढण्यात आल्यामुळे यात्रोत्सवात अडचण निर्माण झाली .
अश्व नृत्य स्पर्धत गर्दी
यावर्षीही चेतक फेस्टिव्हल निमित्त पर्यटकांसह अन्य यात्रेकरूंची संख्या वाढली .भाविकांची अद्यापही गर्दी कायम आहे . चेतक फेस्टिव्हलमध्ये खान्देशासह गुजरात , मध्य प्रदेश राज्यातील प्रेक्षक आनंद घेत आहेत .आज दुपारी सुरु झालेली अश्वनृत्य स्पर्धा रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या .
राजस्थानी नृत्य
विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी राजस्थानाहून खास स्पर्धेसाठी आलेल्या अश्वांनी राजस्थानी नृत्य करत , त्या भागातील वाद्याच्या तालावर ठेका धरत डोळ्यांचे पारणे फेडले, या अश्वांच्या नृत्यांनी वाहवा मिळवली . राज्याच्या विविध भागातील अश्वांच्या या नृत्य स्पर्धत सहभाग नोदवण्यात आला आहे . अश्चख च्या चित्तथरारक कसरती , नृत्य , मागच्या दोन पायांवर चालणे , मालकांच्या आदेशानुसार कान , पाय हलविणे , घुंगरांचा आवाज करणे , नमस्कार करणे , हस्तांदोलन करणे , खाटेवर चारही पाय ठेवत थिरकणे , वाहनांवर उभे राहून नृत्य करणे ,प्रेक्षकांना नमस्कार करणे या सह अन्य कसरती करण्यात आल्या .यावेळी राजस्थानहून आलेला शाहरुख या अश्वनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावीला. त्याच्या मालकाला धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जलद शर्मा व चेतक फेस्टिव्हलचे अध्यक्ष जयपाल रावल यांच्या हस्ते पारितोषीक देण्यात आले.
अश्व बाजारात ३ कोटीचा टप्पा
अश्व बाजारात अश्वाच्या खरेदी विक्रीत जोर वाढला आहे .आज दिवसभरात ५० अश्वाची विक्रीतून २५ लाखाची उलाढाल झाली तर आज अखेरी ७५० घोडयांंची विक्रीतून ३ कोटी, पाच लाखाची उलाढाल झाली . ही उलाढाल चार कोटी पेक्षा जास्त होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे .








