Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महिलेचा मृत्यू आजारामुळे, दरडीखाली सापडल्याने नाही जिल्हा प्रशासनाची माहिती

Mahesh Patil by Mahesh Patil
September 8, 2021
in राज्य
0
चांदसैली घाटात दरड कोसळल्याने  उपचाराअभावी पत्नीने  पतीची खांद्यावर घेतला अखेरचा श्वास
नंदुरबार l प्रतिनिधी
चांदसैली जवळील पिपलाकुवा येथील महिला सिबलीबाई पाडवी यांचा मृत्यू आजारपणामुळे झाला असून दरडीखाली सापडल्याने झालेला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे  देण्यात आली आहे.
अक्राणी तालुक्यातील पिपलाकुवा येथील सदर महिलेला तिच्या कुटुंबियांनी सकाळी 9 वाजेच्या सुमारास तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयातील अधिपरिचारिकेने रुग्णास तपासले असता ती महिला शुद्धीवर नव्हती आणि रक्तदाब आणि पल्स लागत नव्हते. महिलेचे संपूर्ण शरीर थंड पडून कडक झाले होते. त्यावरून रुग्णालयात येण्यापूर्वीच महिला मृत झाल्याची खात्री अधिपरिचारिकेची झाली असल्याने त्याबाबत सोबतच्या व्यक्तींना कल्पना देण्यात आली.
रुग्णास मृत अवस्थेत आणल्याने पोलिसांना कळवून पुढील कार्यवाही करावी लागेल व त्यासाठी केसपेपर काढावा अशी सूचना अधिपरीचारकांनी केली. त्यावर ती व्यक्ती सदर महिलेस मोटर सायकलवर घेऊन गेली. याबाबत  तळोदा पोलीस स्टेशनला  कल्पना देण्यात आली. मृत महिलेची प्रकृती मंगळवारपासून उलटी व जुलाब होत असल्याने अस्वस्थ होती असे महिलेसोबत आलेल्या व्यक्तीनी सांगितले.
नागरिकांनी घटनेबाबत कोणतीही अफवा पसरवू नये किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.चांदसैली घाटातील वाहतूक सुरळीतपणे सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहितीदेखील प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Next Post

सार्वजनिक गणेशोत्सव 2021 निमित्त मार्गदर्शक सूचना जारी

Next Post

सार्वजनिक गणेशोत्सव 2021 निमित्त मार्गदर्शक सूचना जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दत्त जयंती निमित्त सप्ताहाचे सांगता

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दत्त जयंती निमित्त सप्ताहाचे सांगता

December 5, 2025
सारंगखेड्याचा चेतक महोत्सव ग्लोबल करण्यासाठी शासन पाठीशी:मंत्री जयकुमार रावळ

सारंगखेड्याचा चेतक महोत्सव ग्लोबल करण्यासाठी शासन पाठीशी:मंत्री जयकुमार रावळ

December 5, 2025
पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचारी मानधनापासून वंचित, कामबंद आंदोलनाचा इशारा

पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचारी मानधनापासून वंचित, कामबंद आंदोलनाचा इशारा

December 5, 2025
नंदुरबार शहरातील दोन टोळयांमधील 18 जणांना जिल्ह्यातून दोन वर्षासाठी केले हद्दपार

नंदुरबार शहरातील दोन टोळयांमधील 18 जणांना जिल्ह्यातून दोन वर्षासाठी केले हद्दपार

November 24, 2025
भाजपा उमेदवार मकरंद पाटील यांच्या प्रचारार्थ  शहादा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा

भाजपा उमेदवार मकरंद पाटील यांच्या प्रचारार्थ शहादा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा

November 24, 2025
शहादा येथील सराफाला लुटणाऱ्या 11 जणांना अटक,39 लाखांचा मुद्देमाल जप्त

शहादा येथील सराफाला लुटणाऱ्या 11 जणांना अटक,39 लाखांचा मुद्देमाल जप्त

November 24, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group