Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आमपाडा येथे एकल महिला मेळावा 

team by team
December 17, 2022
in सामाजिक
0
आमपाडा येथे एकल महिला मेळावा 

नवापूर l प्रतिनिधी

ग्रासरूट कार्यक्रम पुष्पवन महिला बहुउद्देशीय संस्था नवापुर आणि कोरो इंडिया मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने एकल महिला मेळावा नवापूर तालुक्यातील आमपाडा या ठिकाणी संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष नवापूर पंचायत समिती अध्यक्ष बबीता गावित होते. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून गिरीश जाधव परीवेक्षा अधिकारी , जिल्हा महिला व बाल विकास विभाग गुलाब गावित, आमपाडा सरपंच, ग्रामसेवक शांतू गावित, वनीष गावित ,थुवा सरपंच नरेंद्र गावित सरपंच बिलदा, अशोक गावित नदुरबार, गौतम वाघ बालसंरक्षण अधिकारी नंदुरबार, पं.स सदस्य प्रियंका गावित ,  अंगणवाडी सेविका, कोरो इंडिया जिल्हा समन्वयक सचिन फटकर , वी. डी मोघे आरोग्य सहाय्यक ,दिपाली वळवी लॅबटेक्निशियन इत्यादी मान्यवर उपस्थित होते. गिरीश जाधव आपल्या मनोगत महिलांना संबोधित करताना बालविवाह प्रतिबंध कायदा महिलांचे हक्क सुरक्षा आणि अधिकाराबाबत माहिती दिली. गौतम बालसंरक्षणाधिकारी यांनी महिलांच्या आणि आदिवासींच्या तरतुदींबाबत माहिती दिली, जिल्हा परिषद प्राधिकरण मार्फत पुरवल्या जाणाऱ्या सेवा आणि सुविधा, शासनाचे विविध योजना आणि महिलांचे कायदे याबाबत माहिती दिली. पंचायत समिती सदस्य प्रियंका गावित यांनी महिलांना स्थानिक बोली भाषेत मार्गदर्शन केले. गुलाब गावित यांनी सुद्धा स्थानिक भाषेत महिलांचे विविध योजना विधवा पेन्शन योजना संजय गांधी निराधार योजना आणि घरकुल योजनेबाबत लाभ देण्यासंदर्भात आश्वासित केली.
पुष्पावन महिला बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष यांनी प्रस्तावना म्हणत असताना एकल महिलांच्या अडचणी समस्या आणि पुष्पवन संस्थेच्या माध्यमातून एकल महिलांना समानतेची वागणूक देण्यासंदर्भात चार ग्रामपंचायत  मार्फत ठराव अनिष्ट रूढी परंपरा नाकारण्याबाबतचया यश त्यांनी सांगितले. आपल्या समाजातल्या महिलांचे पती निधनानंतर ज्या काही अनिष्ट रूढी परंपरा अजूनही पाडल्या जातात त्या संदर्भात त्या समोर नष्ट करण्यासाठी सर्व महिलांनी एकत्र येऊन पुष्पवन संस्थेच्या सोबत उभा राहून लढा उभारावा असेही त्यांनी या ठिकाणी आवाहन केले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी एकल महिलांचे रक्ताच्या चाचण्या करण्यात आली.
१०० पेक्षा जास्त एकल महिला उपस्थित होते. अशा पद्धतीने कोरो इंडिया आणि महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या माध्यमातून एकल महिलांचा मेळावा उत्साहात उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्था समन्वयक मारिया गावित , नीता गावित,करुणा गावित बलवंती गावित ललिता गावित पाऊल गावित तसेच अंगणवाडी कार्यकर्त्या व आशा वर्कर यांनी सहकार्य केले
बातमी शेअर करा
Previous Post

राज्यभरातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी नंदुरबारात घटकसंच निर्मिती कार्यशाळा

Next Post

अखेर अक्कलकुवा ग्रामपंचायत प्रशासनाची झोप उघड़ली

Next Post
अखेर अक्कलकुवा ग्रामपंचायत प्रशासनाची झोप उघड़ली

अखेर अक्कलकुवा ग्रामपंचायत प्रशासनाची झोप उघड़ली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add