नंदूरबार l प्रतिनिधी
इलेक्ट्रीक मोटार चोरणारे दोन अल्पवयीन मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
मागील काही दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या शेतातून इलेक्ट्रीक मोटार व इतर शेती साहित्य चोरीच्या घटनांबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना तक्रारी प्राप्त होत होत्या. तसेच शेतकरी बांधव स्वतः देखील त्यांना भेटत होते. नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी मासिक गुन्हे बैठकीत अशा पध्द्तीच्या गुन्ह्यांचा गुन्हे आढावा घेतला असता,
नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना अशा प्रकारचे गुन्हे दाखल असुन ते गुन्हे अद्यापही उघडकीस आलेले नव्हते. पोलीसांसमोर देखील चोरट्यांना जेरबंद करुन घडलेले गुन्हे उघडकीस आणणे आवाहन होते. त्याअनुषंगाने चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करुन गुन्ह्यातील सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करणेबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी निर्देश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले.
नंदूरबार तालुक्यातील करणखेडा गावाजवळ असलेल्या शिवन नदीचे पात्रातुन सुरेश जयसिंग वळवी यांची 10 हजाराची पाण्याची मोटार अज्ञात आरोपीतांनी चोरुन नेली म्हणून उपनगर पोलीस ठाण्यात भादंवि क 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
१० डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, करणखेडा गावाजवळील शिवन नदीचे पात्रातून चोरीस गेलेली पाण्याची इलेक्ट्रीक मोटार पापनेर ता. जि. नंदुरबार येथील एक अल्पवयीन व त्याचे इतर साथीदारांनी चोरलेली आहे. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे तात्काळ एक पथक तयार करुन बातमीची खात्री करून तात्काळ संशयीत इसमास ताब्यात घेवून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पापनेर गावात जावून मिळालेल्या माहितीमधील अल्पवयीन मुलाची माहिती काढली असता तो घरी असल्याचे समजले. म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकोन अल्पवयीन मुलास त्याच्या पालकांसमोर ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारून करणेखडा येथील पाण्याची इलेक्ट्रीक मोटारबाबत विचारपूस केली असता त्याने सदरची चोरी त्याचा एक अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने केली असल्याचे सांगितले. म्हणून त्यास चोरी केलेली पाण्याची इलेक्ट्रीक मोटार कोठे आहे ? याबाबत विचारले असता त्याने चोरी करुन आणलेली पाण्याची मोटार त्याच्या घराचे मागे लपवून ठेवल्याचे सांगितल्याने
त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील 10 हजार रुपये किमंतीची इलेक्ट्रीक पाण्याची मोटार कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत करण्यात आली आहे.
तसेच ताब्यात घेण्यात आलेले दोन्ही अल्पवयीन यांना पुढील कारवाईकामी उपनगर पोलीस ठाणे येथे समक्ष हजर केले आहे. तसेच त्यांचे इतर तीन साथीदार परेश पाडवी रा. पापनेर, वंजारी तांडा ता. जि. नंदुरबार व राहुल भिल रा. खामगांव यांना यापूर्वीच वडझाकण येथील ट्रॅक्टरची बॅटरी चोरीच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहा. पोली निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, पोलीस नाईक विशाल नागरे, मोहन ढमढेरे, अविनाश चव्हाण, पोलीस शिपाई शोएब शेख, आनंदा मराठे, रामेश्वर चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.








