नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील देवमोगरा पुनर्वसन येथे पैसे न दिल्याच्या कारणावरुन दोघा भावांना मारहाण करीत एकावर चाकूने कानावर वार करुन दुखापत केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील देवमोगरा पुनर्वसन येथील काल्या शेरका वळवी व त्यांचा लहान भाऊ सकऱ्या यांच्याकडून चार हजार रुपये मागितले. पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन काल्या वळवी व सकऱ्या यांना लालसिंग लेकाऱ्या पाडवी, भुरा लेकाऱ्या पाडवी व दिल्या वाण्या पाडवी यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली.
तसेच लालसिंग पाडवी याने काल्या वळवी यांच्या कानावर चाकूने वार करुन दुखापत केली. तसेच जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत काल्या वळवी यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम ३२४, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.अतुल गावित करीत आहेत.








