Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बॅटरी चोरी करणारी टोळी गजाआड, दोघा अल्पवयीनसह चौघांना अटक

team by team
December 11, 2022
in क्राईम
0
तीन जिल्ह्यात ३१ घरफोड्या करणारा सराईत चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

नंदुरबार |  प्रतिनिधी

बॅटरी चोरणार्‍या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. यात दोन आरोपींसह व दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. त्यांच्याकडून मुद्देमालासह मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.

 

 

दि.२ डिसेंबर २०२२ रोजी रात्री १० ते दि.३ डिसेंबरदरम्यान उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील वडझाकण येथील विकास भरत पाडवी यांच्या अंगणातून ८ हजार  रुपये किमतीची ट्रॅक्टरची बॅटरी अज्ञात आरोपीतांनी चोरुन नेली म्हणून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सुमारे ८ दिवसापूर्वी वडझाकण येथील ट्रॅक्टरची बॅटरी खामगांव येथील राहुल भिल व त्याच्या इतर साथीदारांनी चोरलेली आहे व नंदुरबार शहरातील माळीवाडा भागात मोटार सायकलवर घेवून ती विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना मिळाली.

 

 

 

त्यांनी एक पथक तयार केले. पथकाने नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरात शोध घेतला असता एक संशयीत इसम मिळून आला. राहुल लक्ष्मण भिल (वय-२२ रा. खामगांव ता.जि.नंदुरबार) असे त्याचे नाव आहे. त्याने वडझाकण येथील ट्रॅक्टरच्या बॅटरीची चोरी त्याचे साथीदार परेश पाडवी (रा.पापनेर ता.जि.नंदुरबार) व इतर तीन साथीदारांच्या मदतीने केली असल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यात मिळून आलेली गुन्ह्यातील ८ हजार रुपये किमंतीची ट्रॅक्टर बॅटरी व २० हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकुण २८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत करण्यात आला आहे.

 

 

त्याचे इतर साथीदार परेश परविन पाडवी (वय-२३) व दोन अल्पवयीन सर्व रा. पापनेर ता.जि. नंदुरबार यांना ताब्यात घेण्यात आले आहे.  त्यांना वडझाकण येथील ट्रॅक्टरची बॅटरी चोरीच्या गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनीदेखील चोरी केल्याचे सांगितले. राहुल लक्ष्मण भिल वय-२२ रा. खामगांव ता.जि. नंदुरबार, परेश परविन पाडवी वय-२३ व दोन अल्पवयीन रा. पापनेर ता.जि. नंदुरबार यांना मुद्देमालासह गुन्ह्याच्या पुढील तपासकामी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

सदर कामगिरी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, पोलीस नाईक विशाल नागरे, मोहन ढमढेरेे, पोलीस शिपाई शोएब शेख, आनंदा मराठे, रामेश्वर चव्हाण यांच्या पथकाने केली.

बातमी शेअर करा
Previous Post

गुदद्वारात एअर ब्लोअर मशिन घातल्याने तरुण अत्यवस्थ, सुजलॉन कंपनीतील घटना

Next Post

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ‘फ्रीडम पार्क ते खापरी’ दरम्यान मेट्रोने प्रवास

Next Post
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ‘फ्रीडम पार्क ते खापरी’ दरम्यान मेट्रोने प्रवास

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ‘फ्रीडम पार्क ते खापरी’ दरम्यान मेट्रोने प्रवास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add