नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील शास्त्री मार्केट परिसरात असलेले दोन कापड दुकान फोडून चोरट्यांनी गल्ल्यात असलेली २ लाख २६ हजाराची रोकड चोरुन नेली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील शास्त्री मार्केट परिसरात असलेले गुरुनानक व श्री लक्ष्मी होजिअरी या दोन्ही दुकानांचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करुन दोन्ही दुकानाच्या गल्ल्यात असलेली २ लाख २६ हजाराची रोकड चोरुन नेली.
याबाबत गुलाब चंद्रमल गलाणी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतापसिंग मोहिते करीत आहेत.









