नंदूरबार l प्रतिनिधी
का.वि.प्र.संस्था भालेर संचलित श्रीमती क.पु. पाटील माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय भालेर ता.नंदूरबार येथे शिक्षण विभाग (B.R.C कार्यालय) नंदुरबार व क.पु. पाटील विद्यालय भालेर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.
दिव्यांग विद्यार्थी व कर्मचारी यांचे मनोबल वाढवण्यासाठी भालेर केंद्रातील सर्व दिव्यांग विद्यार्थी यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या . या कार्यक्रमाचे अध्यक्ष एस. एन. पाटील साहेब (शिक्षण विस्तार अधिकारी), प्रमुख पाहुणे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील, केंद्रप्रमुख वसंत पाटील, उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, श्री.बच्छाव, सरपंच सौ.एस.पी. बागुल, प्राचार्य सौ. विद्या चव्हाण, माजी.पर्यवेक्षक पी.पी. बागुल, पर्यवेक्षक ए.व्ही.कुवर उपस्थित होते. एस.एन.पाटील यांनी प्रतिमांचे पूजन केले.त्यानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या.
लिंबू चमचा शर्यत, सुई दोरा शर्यत, बकेट मध्ये बॉल टाकणे, 50 मीटर धावणे, संगीत खुर्ची यात विनर झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभाग नंदुरबार यांच्यामार्फत ड्रॉइंग नोटबुक, पेन्सिल, रबर,स्केच, पेन, कलर सर्व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा आनंद अवर्णनीय होता. तसेच श्री.बच्छाव यांनी संस्था अध्यक्ष, मुख्याध्यापिका आनंदा पाटील पालक नाना चव्हाण, वर्गशिक्षक पालक यांच्या दिव्यांगा बाबत मुलाखती घेतल्या श्री. कुवर यांनी मनोगत व्यक्त केले. एस एन. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन व्ही. व्ही.इसी यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षण विभागातील आलेले कर्मचारी व विद्यालयातील सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.









