Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘वेध भविष्याच्या, विचार राष्ट्रवादीच्या या विषयावर मंथन शिबिर

team by team
December 11, 2022
in राजकीय
0
शहादा येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘वेध भविष्याच्या, विचार राष्ट्रवादीच्या या विषयावर मंथन शिबिर
शहादा l प्रतिनिधी
             येथील तैलिक मंगल कार्यालयात आज सकाळी दहा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शरदचंद्र पवार यांच्या  १२ डिसेंबर रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त शहर तालुका व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘वेध भविष्याच्या, विचार राष्ट्रवादीच्या या विषयावर मंथन शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिराचे अध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे तर या मंथन शिबिरात मार्गदर्शनासाठी वक्ता सेलच्या प्रदेशाध्यक्ष सिंधुताई तुपकर या उपस्थित होत्या.
        शहादा येथील दैनिक मंगल कार्यालयात सकाळी दहा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वेध भविष्याच्या विचार राष्ट्रवादीच्या या विषयावर मंथन शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे व शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी वक्ता सेलच्या प्रदेशाध्यक्ष सिंधुताई तुपकर या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाप्रसंगी थोर पुरुषांना अभिवादन करीत खासदार शरद पवार यांना जन्मदिनाच्या जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शुभेच्छा देण्यात आले. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार उदयसिंग पाडवी, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष माधव पाटील, शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, जिल्हा परिषदेचे सदस्य मोहन शेवाळे, सोनवद गावाचे उपसरपंच राजेंद्र वाहक, डॉक्टर सेलचे प्रदेश सदस्य डॉ.तुषार सनंसे, राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा, महिला जिल्हा सरचिटणीस सीमा सोनगिरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
         राष्ट्रवादी काँग्रेसच्या वक्ता सेलच्या प्रदेश अध्यक्ष सिंधुताई तुपकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन शिबिरा प्रसंगी मार्गदर्शन करताना सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शाहू फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम या पक्षात कायम सुरू असते महिलांना राजकारणात आधी ३३ टक्के आरक्षण होते. मात्र राष्ट्रवादीच्या प्रयत्नांनी आत्ता ५० टक्के आरक्षण हे खासदार शरदचंद्र पवार यांच्यामुळे मिळाला आहे.सैन्य दलातील महिलांचे आरक्षण हे खासदार शरदचंद्र पवार यांच्या कार्यकाळात संरक्षण मंत्री असताना ते करण्यात आले आहे.
त्यांनी महिला आयोग स्थापन करून व ऐतिहासिक शेतकरी कर्जमाफी केली होती. त्यांच्या कार्यकाळात अनेक गरजू वंचितांच्या योजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जात होती त्यांनी अनेक योजना ही निर्माण केल्या ज्या छत्रपती शिवरायांनी हा महाराष्ट्र घडवला त्यांच्या सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या काही जातीवादी लोकांकडून अपमान करण्याचं काम सुरू आहे त्यातच राज्यपाल पासून तर मंत्रिपदावर विराजमान असलेले सत्याधारी लोक करीत आहेत. त्यात राज्यपाल यांनी शिवरायांच्या अपमान केला आहे. त्यांच्या मी जाहीर निषेध करते त्यांनी आपल्या नावात असलेल्या ” या थोर महापुरुषाच्या नावाची तरी लाज बाळकली पाहिजे होती असे त्यांनी बोलताना सांगितले. या पदांवर विराजमान असलेली सत्ताधारी लोक अशा पद्धतीने थोर पुरुषांचे अपमान करीत आहे.मात्र, केंद्र सरकार यांच्याकडे फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सातत्याने सत्ताधारी बहुजन समाजातील थोर महापुरुषांच्या बदनामीचे षडयंत्र रचत असल्याचेही त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
           राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मी जिल्हाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर पहिल्याच बैठकीत सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना बोलताना सांगितले होते.  दोन वर्ष जिल्हा राष्ट्रवादीच्या मंथनातून जाईल. त्यानंतरचे दिवस हे फक्त राष्ट्रवादीचे आहे. गेल्या दोन वर्षात जे राष्ट्रवादीचे सैन्य तयार केले त्या सैन्याला घेऊन आपण गेल्या दोन वर्षात निवडणूकीचे युद्ध लढलो. जिल्ह्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या निवडणुका राष्ट्रवादीच्या छोट्या-छोट्या सैनिकांमुळे लढलो. निवडणुकीत ग्रामपंचायत, पंचायत समिती व  जिल्हा परिषद सदस्य यांच्या माध्यमातून अनेक ग्रामपंचायती ह्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने सहकार्याने ताब्यात घेतल्या. छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर राष्ट्रवादी पक्ष जिल्ह्यात मजबूत होत आहे.
 प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, येणाऱ्या २०२४ च्या निवडणुक निकालानंतर राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असणार, राष्ट्रवादी पक्ष हा लहान पक्ष नसून अथांग सागर आहे. राष्ट्रवादीच्या बूंद बूंद कार्यकर्त्यांनी मिळून हा अथांग महासागर पक्षाचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांनी बनविला आहे, विचार मंथनातून भूतकाळ , वर्तमान व भविष्य काळाच्याही विचार करावा लागेल, राष्ट्रवादी म्हणजे थोरपूर्षांच्या विचारांनी चालणारा पक्ष आहे. सर्वे सर्व खासदार शरद पवार हे राष्ट्रवादीचे प्रमुख नसून हे गुरु सुद्धा आहे. वंचितांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणारा हा एकमेव राष्ट्रवादी पक्ष आहे.
      या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे मोहन शेवाळे, राजेंद्र पाटील, दानेश पठाण, डॉक्टर सेलचे प्रदेश सदस्य डॉक्टर तुषार सनांसे आदींनी मार्गदर्शन केले.  शिबिर यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष माधव पाटील शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, डॉक्टर सेलचे प्रदेश सदस्य डॉ. तुषार सनंसे, सोनवद ग्रामपंचायतचे उपसरपंच राजेंद्र वाघ, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट दानेश पठाण, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नितीन पवार, मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष संजय खंदारे, महिला जिल्हा सरचिटणीस सीमा सोनगिरे, महिला तालुका सरचिटणीस अलका जोंधळे, तालुका अध्यक्ष रेशमा पवार, तालुका उपध्यक्ष मंजुळा पावरा प्रयत्न केले.
बातमी शेअर करा
Previous Post

जगात स्वाभिमानाने जगण्यासाठी आदिवासींना शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही- आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित

Next Post

पहिल्याच आठवडयात अश्वांच्या खरेदी विक्रीतून एक कोटीपेक्षा जास्तीची उलाढाल

Next Post
आठ डिसेंबर पासून सारंगखेडा यात्रोत्सवाला होणार प्रारंभ, आज निघणार एक मुखी दत्ताची पालखी

पहिल्याच आठवडयात अश्वांच्या खरेदी विक्रीतून एक कोटीपेक्षा जास्तीची उलाढाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add