Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोद्यात  ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’निमित्त काढण्यात आली भव्य वाहन फेरी

team by team
December 10, 2022
in सामाजिक
0
तळोद्यात  ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’निमित्त काढण्यात आली भव्य वाहन फेरी
तळोदा  l प्रतिनिधी
 शेकडो हिंदू प्रेमींच्या सहभागाने तळोदा शहरातून आज शनिवार 10 डिसेंबर  रोजी काढण्यात आलेल्या वाहन फेरीने समस्त तळोदा वासीयांचे लक्ष वेधून घेतले. उद्या रविवार रोजी होणाऱ्या हिंदू राष्ट्र जागृती सभेच्या निमित्त नागरिकांना आवाहन करण्यासाठी ही वाहन फेरी काढण्यात आली. प्रत्येक गल्लीत प्रत्येक चौकात धर्मध्वजाचे पूजन करून आणि वाहन फेरीत सहभागी झालेल्या युवकांवर फुलांची उधळण करून नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
हिंदूवर होणार्‍या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ११ डिसेंबर २०२२ या दिवशी माळी समाज मंगल कार्यालय, तळोदा येथे सायंकाळी ५:३० वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे.
सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जा
धव, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्य संघटक सुनील घनवट आणि हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांड हे वक्ते म्हणून या सभेत मार्गदर्शन करणार आहेत. या सभेच्या ठिकाणी क्रांतीकारकांबद्दल माहिती देणारे फलक, हिंदूंना प्रतीदिन करावयाच्या धर्माचरणाच्या कृती, साधना यांविषयी मार्गदर्शन करणारे फलक प्रदर्शन, तसेच हिंदूंमध्ये जागृती करणार्‍या ग्रंथांचे अन् हिंदूना धर्मशिक्षण देणार्‍या विविध ग्रंथाचे प्रदर्शनही लावण्यात येणार आहे. तसेच स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिके दाखवण्यात येणार आहेत.
दरम्यान सभेसाठी तळोदा शहर परिसरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये प्रसार चालू असून गेले महिनाभर विविध तरुण मंडळे, महिलांचे गट, ग्रामस्थ, हिंदुत्वनिष्ठ, लोकप्रतिनिधी यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. या अंतर्गतच सभेच्या प्रचारासाठी आज शनिवार दिनांक १० डिसेंबर या दिवशी वाहन फेरी काढण्यात आली . प्रारंभी धर्मध्वजाचे पूजन करून श्रीदत्त मंदिरापासून आरंभ करण्यात आला. नंतर काका शेठ गल्ली मार्गे बिरसा मुंडा चौकात आल्यावर श्री वसंत पाटील यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला माल्या अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर वाहन फेरी पुढे निघाली. खानदेश गल्ली गणपती गल्ली ठाणे घर गल्ली मोठा माळीवाडा हनुमान मंदिर संविधान चौक एबी चौक या मार्गाने येऊन माळी समाज मंगल कार्यालयात वाहन फेरीची सांगता करण्यात आली. त्या ठिकाणी हिंदू जनजागृती समितीचे  अमोल वानखेडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वाहन फेरीत 250 वाहनधारक सहभागी झाले होते.
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हा प्रशासन व एन.टी. व्ही. एस. विधी महाद्यालयाच्या वतीने मानवाधिकार दिन साजरा

Next Post

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपूरमध्ये समृद्धी महामार्ग, एम्स, मेट्रोसह विविध प्रकल्पांचे लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add