शहादा l प्रतिनिधी
दामळदा ता.शहादा येथील विजयेश्वर महादेव मंदिर बांधकामासाठी गावातील रहिवासी सिव्हिल इंजिनियर प्रा.छोटूलाल पुनमचंद पाटील यांनी 5100 रुपये देणगी दिली असून त्यांच्या दातृत्वाची ग्रामस्थांनी प्रशंसा केली आहे.
प्रा.छोटूलाल पाटील यांनी लोणखेडा येथील पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनियरची पदवी प्राप्त केली.लोणखेडा कॉलेजलाच सिव्हिल इंजिनियर विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.प्रा.छोटूलाल पाटील यांनी आपल्या सिव्हिल इंजिनियरिंग अनुभवाद्वारे भव्य इमारती उभ्या केल्या आहेत.
त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत गावातील मंदिर बांधकामासाठी खारीचा वाटा उचलावा या हेतूने देणगी दिली आहे. त्यांचे वडील पुनमचंद पाटील यांच्या हस्ते देणगी देण्यात आली . यावेळी मोहन पाटील, संजय पाटील, शिवदास पाटील, परशुराम पाटील व प्रा. छोटूलाल पाटील यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.