नंदुरबार l
शहरासह जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय, शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्याचे आदेश काढण्यात यावे, अशी मागणी नंदुरबार जिल्हा राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाने केली आहे.
याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, नायब तहसीलदार भीमराव बोरसे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी व भाजपाचे प्रदेश महामंत्री तथा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, तेली समाजाचे आराध्य दैवत संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती दरवर्षी आठ डिसेंबरला येत असते. म्हणून यावर्षीपासून 8 डिसेंबरला संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील शासकीय व निम शासकीय कार्यालयांचा शाळा महाविद्यालयांमध्ये साजरी करण्यात यावी.
संत संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी करण्याचे परिपत्रक काढून आदेश द्यावे. येत्या 8 डिसेंबर 2022 रोजी संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्याचे आदेशित करावे, अशी मागणी नंदुरबार जिल्हा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र कलाल, युवक जिल्हाध्यक्ष प्रशांत माळी महिला जिल्हाध्यक्ष प्रतिभा चौधरी युवक जिल्हा उपाध्यक्ष साजन साठे, युवक जिल्हा सचिव जयेश चौधरी, महिला नंदुरबार तालुकाध्यक्षा सुषमा सोनवणे युवक जिल्हा कार्याध्यक्ष चेतन माळी युवक जिल्हा महासचिव कपिल चौधरी आदींनी निवेदनातून केली आहे.