Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करा; नंदुरबार जिल्हा मनसेचे पोलीस अधिक्षकांना निवेदन

team by team
December 7, 2022
in Uncategorized
0
मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करा; नंदुरबार जिल्हा मनसेचे पोलीस अधिक्षकांना निवेदन

नंदुरबार  l

राज्यातील मशिदींवरील अनधिकृत असलेले भोंगे काढण्याची कारवाई करावी, असा आदेश मनसेचे अध्यक्ष हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे यांनी 4 मे 2022 रोजी दिला होता. त्यानुसार राज्यभर अनिधिकृत भोंग्याविरोधात आंदोलन करण्यात आले. म्हणुन नंदुरबार शहरातील मशिदींवरील अनधिकृत भोंग्यावर कारवाई करावी. तसेच ज्याठिकाणी परवानगी दिली आहे, तेथे न्यायालयाच्या आदेशानुसार भोंग्याचा आवाज नियंत्रित ठेवण्यात यावा, अशी नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय विश्वनाथ चौधरी यांनी केली आहे.

याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. सदरचे निवेदन जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी निवेदन स्विकारले. या निवेदनात म्हटले आहे की, मनसेचे अध्यक्ष हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार दि.4 मे 2022 रोजी महाराष्ट्र राज्यात अधिकृत व अनधिकृत अश्या मशिदींवरील बेकायदेशीररित्या बसवण्यात आलेल्या आणि वापरात असलेल्या कायद्याअंतर्गत सर्व अनधिकृत भोंगे (लाऊडस्पीकर) काढण्यासाठी राज्यभर आंदोलन झाले.

परंतु नंदुरबार शहरातील काही भागात मशिदींवरील भोंग्यांवर अद्याप कारवाई झालेली नाही. वेळोवेळी येणार्‍या भोंग्यांवरील ध्वनी त्रासदायक आहेत. म्हणुन न्यायालयाचा आदेशाचे पोलिस प्रशासनाने पालन करुन नंदुरबार शहरातील सर्व अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करावी. तसेच ज्या ठिकाणी परवानगीने भोंगे आहेत, ते न्यायालयाच्या आदेशानुसार त्या भोंग्यांचा आवाज नियंत्रित ठेवण्याची कार्यवाही व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय विश्वनाथ चौधरी, नंदुरबार तालुकाध्यक्ष राकेश माळी, जिल्हा सचिव पवनकुमार गवळे, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुनील कोकणी, उपतालुकाध्यक्ष विनोद वसावे, मनसे विद्यार्थी सेनेचे राम ठक्कर, प्रसिध्दी प्रमुख कल्पेश माळी, अशोक माळी, योगेश चौधरी, दीपक चौधरी, ऋषी चौधरी आदींनी निवेदनातून केली आहे

बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – मंत्री विजयकुमार गावित

Next Post

महापरिनिर्वाण दिनानिमित 66 रक्तदात्यांनी रक्तदानातून बाबासाहेबांना केले कृतिशील अभिवादन

Next Post
महापरिनिर्वाण दिनानिमित 66 रक्तदात्यांनी  रक्तदानातून बाबासाहेबांना केले कृतिशील अभिवादन

महापरिनिर्वाण दिनानिमित 66 रक्तदात्यांनी रक्तदानातून बाबासाहेबांना केले कृतिशील अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add