Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – मंत्री विजयकुमार गावित

team by team
December 7, 2022
in राजकीय
0
आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – मंत्री विजयकुमार गावित

ठाणे  l

आदिवासी समाज हा शिक्षणाने प्रगती करू शकतो. त्यांच्या शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी निधी कमतरता पडू देणार नाही, असे प्रतिपादन आदिवासी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.

मीरा भाईंदर येथील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहांचे लोकार्पण मंत्री डॉ. गावित यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात मंत्री डॉ. गावित बोलत होते. यावेळी  आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडीत, खासदार राजेंद्र गावित, आमदार प्रताप सरनाईक, गीता जैन, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मिरा भाईंदर आयुक्त दिलीप ढोले, आदिवासी विभागाचे सहसचिव श्री. वसावे, प्रकल्प अधिकारी रंजना किल्लेदार आदी उपस्थित होते.

मंत्री डॉ. गावित म्हणाले की, आश्रमशाळेतील चांगली खेळणारी मुले एकत्र करून त्यांना चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून त्यांच्याकडून स्पर्धा परीक्षांची तयारी करुन घेण्यात येणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ. त्यासाठी विद्यार्थ्यांना कुठे जाण्याची गरज लागणार नाही.

विविध योजनांसाठी लागणारी आवश्यक  असणारी कागदपत्रे आदिवासी बांधवाकडे नाहीत. त्यामुळे त्यांना योजनाचा लाभ घेता येत नाही. त्यासाठी आदिवासी बांधवाना आधारकार्ड व बॅंक पासबुक तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावे. जिथे जिथे जागा उपलब्ध होईल तिथे आश्रमशाळा उभारण्यात येईल. इमारत दोन वर्षामध्ये पूर्ण करण्यात येईल. आदिवासी योजनासाठी निधीची कमतरता पडणार नाही, असेही श्री. गावित म्हणाले.

श्री.पंडीत म्हणाले की,  आपल्या आश्रमशाळा खुप जुन्या झाल्या आहेत. त्या नवीन बनवण्याची आवश्यकता आहे. आढावा समिती मार्फत शिफारशी केल्या आहेत. तालुक्याच्या ठिकाणी इमारती उभा करण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांचे व्यवस्थापन पाहणे सोपे होईल. आदिवासीचे वन जमिनीचे दावे प्रलंबित आहेत.त्यावर मार्ग काढला तर त्यांना न्याय मिळेल.

श्री. सरनाईक म्हणाले की,  ठाण्यामध्ये आदिवासी मुलींच्या वसतीगृहाचे भूमीपूजन या महिन्यात मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्त होणार आहे. या वसतीगृहामध्ये 700 मुली एकावेळी राहू शकतील. त्यामुळे आदिवासी मुलींच्या राहण्याचा प्रश्न लवकरच मिटेल. आदिवासी विकासासाठी त्यांना मूलभूत सुविधा लवकरात लवकर पुरविण्यात येणार आहेत. आदिवासी पाड्यातील पाण्याचा प्रश्न ही सोडविणार आहे.

यावेळी  उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी  श्री. शिनगारे म्हणाले की, आदिवासीच्या जमिनीना दिलेल्या अधिकारांचा वापर करुन त्यांना संरक्षण देण्यात येईल. आदिवासीच्या योजनांची प्रभावीपणे अमंलबजावणी करण्यात येईल.यावेळी पालघरचे खासदार राजेंद्र गावित, आमदार गीता जैन, आयुक्त दिलीप ढोले यांनी मनोगत  व्यक्त केले.

बातमी शेअर करा
Previous Post

शाळा स्थलांतर प्रमाणपत्र (टीसी) अभावी शालेय विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबणार नाहीत

Next Post

मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करा; नंदुरबार जिल्हा मनसेचे पोलीस अधिक्षकांना निवेदन

Next Post
मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करा; नंदुरबार जिल्हा मनसेचे पोलीस अधिक्षकांना निवेदन

मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करा; नंदुरबार जिल्हा मनसेचे पोलीस अधिक्षकांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add