Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी 31 डिसेंबर पर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Mahesh Patil by Mahesh Patil
December 6, 2022
in कृषी
0
शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी 31 डिसेंबर पर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी

कार्यकारी अभियंता,धुळे मध्यम प्रकल्प विभागी पथक यांच्या अधिपत्याखालील नंदुरबार जिल्ह्यातील रंगावली, प्रकाशा, सारंगखेडा मध्यम प्रकल्प, 33 लघु प्रकल्प, को.प.बंधारे 6, वळण बंधारे 20 असे एकूण 62 व जिल्ह्यातील अधिसूचित नदी-नाले तसेच पाण्याचा फायदा घेणाऱ्या बागायतदारांनी बागाईतदारांना 14 ऑक्टोबर 2022 ते 28 फेब्रुवारी 2023 या कालावधीकरीता सुरू झालेल्या रब्बी हंगाम 2022-2023 साठी 31 डिसेंबर, 2022 पर्यंत पाणी अर्ज सादर करायचे आहेत.

सर्व बागायतदारांनी आपले नमुना नं. 7, 7 (अ), 7 (ब) चे पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात सादर करावेत. बागायतदारांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार मंजूरी देण्यात येईल. बागायतदांरानी आपआपल्या शेतचाऱ्या स्वच्छ व सुस्थितीत ठेवाव्यात. पाणी अर्ज स्विकारण्याची मुदत पुरेशी देण्यात आली असून मुदतीनंतर आलेल्या पाणी अर्जाचे मंजुरी बाबत उपलब्ध पाणीसाठा व अगोदर आलेली मागणी विचारात घेवून नंतरच मंजूरी, ना मंजुरीचा विचार करण्यात येईल.

मंजूरी व पाणी पुरवठ्याबाबत अन्नधान्ये, भुसार, चारा,डाळी, कपाशी, भुईमूंग व इतर हंगामी पिकांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार प्रथम प्राधान्य देण्यात येईल. पाण्याचा रितसर पास मिळाल्याशिवाय पाणी घेऊ नये. थकबाकीदारांनी मागील संपूर्ण थकबाकी दरसाल दर शेकडा 10 टक्के जादा आकारासह भरणे आवश्यक आहे. पाणी नाश, पाळ्या नसताना पाणी घेणे, मंजुरीपेक्षा अधिक क्षेत्र भिजविणे, विहीरीवरील पिकास कालव्याचे पाणी घेणे, पाटमोट संबंध दूर न करणे आदी प्रकाराबाबत नियमानुसार पंचनामे करून दंडाच्या दराने आकारणी करण्यात येईल.

टंचाई परिस्थितीत ऐन हंगामात पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा लागल्यास पीक नुकसान भरपाई देता येणार नाही. पाणी अर्ज शाखा कार्यालय किंवा उपविभागीय कार्यालयास देऊन पोहोच पावती घेण्यात यावी. शासनाने काही सवलती दिल्यास त्याबाबत कळविण्यात येईल.

लाभक्षेत्रातील तसेच कालव्यापासून 35 मीटर अंतराच्या हद्दीतील विहिरींबाबत नमुना 7 (ब) मागणी अर्ज न करता बिनअर्ज क्षेत्र भिजविण्यात आल्यास प्रचलित नियमानुसार पंचनामे करण्यात येतील. हस्तांतर झालेल्या पाणी वापर संस्थांना घनमापन पद्धतीने पाणी देण्यात येईल, असे एन.एम.व्हट्टे कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग,धुळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

सारंगखेडा यात्रेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल

Next Post

अरे बापरे : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसमधून अचानक निघाला धूर…

Next Post
अरे बापरे : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसमधून अचानक निघाला धूर…

अरे बापरे : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसमधून अचानक निघाला धूर...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खान्देश स्तरीय पुरुषोत्तम चषक उत्साहात

दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खान्देश स्तरीय पुरुषोत्तम चषक उत्साहात

October 15, 2025
महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ जाहीर,५० हजार कोटींची गुंतवणूक, पाच लाखांवर रोजगार निर्मिती

महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ जाहीर,५० हजार कोटींची गुंतवणूक, पाच लाखांवर रोजगार निर्मिती

October 15, 2025
जंगल नसलेल्या, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्येच्या गावांचाही ‘पेसा’मध्ये समावेश करावा : उपमुख्यमंत्री अजित पवार

जंगल नसलेल्या, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्येच्या गावांचाही ‘पेसा’मध्ये समावेश करावा : उपमुख्यमंत्री अजित पवार

October 15, 2025
राजकारण करतांना भाऊबंदकी कायम ठेवा; आ. चंद्रकांत रघुवंशींच्या शिवसैनिकांना सल्ला

राजकारण करतांना भाऊबंदकी कायम ठेवा; आ. चंद्रकांत रघुवंशींच्या शिवसैनिकांना सल्ला

October 13, 2025
जिल्ह्यात 5 बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल, नऊ जणांना दिल्या नोटीस

जिल्ह्यात 5 बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल, नऊ जणांना दिल्या नोटीस

October 13, 2025
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  दीपकबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम

पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम

October 13, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group