नंदुरबार l
अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावरील पिंप्रीपाडा फाट्याजवळ वाहनाने ओमनी कारला धडक दिल्याने एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अंकलेश्वर तालुक्यातील भडकोदरा येथील नितीन लक्ष्मण सोमवंशी हे त्यांच्या ताब्यातील ओमनी कार (क्र.जी.जे.१६ बीजी ५९१९) विजय पंडीत मोतीराया यांना बसवून शिरपूरहून अंकलेश्वरकडे जात होते. यावेळी धर्मेंद्रकुमार श्रीकाशिनाथ यादव यांनी त्यांच्या ताब्यातील वाहन (जी.जे.०५ सीयू ०८६३) वरील वाहन चालकाने अचानक रॉँग साईडने वाहन चालवून ओमनी कारला पिंप्रीपाडा फाट्याजवळ धडक दिल्याने अपघात घडला.
घडलेल्या अपघातात नितीन सोमवंशी हे ठार तर विजय मोतीराया यांना दुखापत झाली. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत विजय मोतीराया यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात धर्मेंद्र श्रीकाशिनाथ याच्याविरोधात भादंवि कलम ३०४(अ), २७९, ३३७, ३३८, ४२७, सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मनोहर कोळी करीत आहेत.