नंदुरबार l
शहादा तालुक्यातील आडगाव येथे मागील भांडण का सोडवली या कारणावरुन एकास लोखंडी सळईने मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील आडगाव येथील कमलेश अनिल रावताळे यांना भांडण सोडविल्याच्या कारणावरुन पवन रतिलाल सुळे व संदिप रतिलाल रावताळे यांनी लोखंडी सळईने मारुन दुखापत केली. तसेच रोहित कैलास पवार, भिमा यांनी फायटरन व हाताबुक्योंनी मारहाण केली.
तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबात कमलेळ रावताळे यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.जितेंद्र पाडवी करीत आहेत.