नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेघर संघर्ष समिती चे अध्यक्ष दिलावरशा कादरशा, चिरागोद्दीन शेख, रेहाना खाटीक यांचे नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
नंदुरबार शहरात म्हाडा ची योजना राबवून गोर गरीब, गरजू कुटुंबांना मोफत घरकुल बांधून द्यावे. ऐकात्मीक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम अंतर्गत बांधलेले ८७६ घरकुलांपैकी शिल्लक राहिलेली २४० घरकुले प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बेघर कुटुंबांना त्वरित वाटप करावेत, आदी मांगण्याचे निवेदन जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री यांना शिष्टमंडळाने
सादर केलं.
सदर निवेदन उपजिल्हाधिकार सुधीर खांदे यांनी स्विकारले, आणि मांगण्या शासना पर्यंत पोहोचवून गोर-गरीबांचे घरकुलचे प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, बेघर संघर्ष समिती च्या या आंदोलनात शेकडो महिला लाभार्थी सहभागी झाले होते.