म्हसावद l प्रतिनिधी
शिक्षक हे केवळ आपल्याला पुस्तकी ज्ञान शिकवत नाही तर आपल्याला जगण्याची कला शिकवितात आणि आपले व्यक्तिमत्व घडवीत असतात.अशा शिक्षकांचा आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे” असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित शिक्षण सभापती व कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश पराडके यांनी येथील सन्मित्र बहुउद्देशीय क्रीडा मंडळातर्फे
जनगौरव आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण प्रसंगी केले.
शहादा येथील मीराप्रताप लाॅन येथे आयोजित कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील,तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, सदगुरू विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुभाष आण्णा पाटील,प्रा.विश्वासराव पाटील,निवृत्त सनदी अधिकारी आ.भ.जगताप,माजी शिक्षण सभापती व जि.प.सदस्या जयश्री पाटील,गटशिक्षणाधिकारी डी.टी.वळवी, सर सैय्यद अहेमदखान एज्यु.सोसायटी चेअरमन प्रा.लियाकतअली सैय्यद,सन्मित्र क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रा.ज्ञानी कुलकर्णी,ॲड.राजेश कुलकर्णी, प्रा.संपत कोठारी, समीर जैन,प्रा.आर टी पटेल,रोहन माळी, प्रतिमा माळी, प्रविणा कुलकर्णी, प्रतिभा बोरसे उपस्थित होते.
सभापती गणेश पराडके पुढे म्हणाले की, सन्मित्र क्रीडा मंडळाची गुणवंत आदर्श शिक्षकांची निवड पद्धत खूप चांगली आहे.त्या पद्धतीचाच वापर शासनानेही केला पाहिजे.जिल्हा परिषद तर्फे याचा विचार केला जाईल असे मत व्यक्त केले.याप्रसंगी तहसीलदार मिलिंद कुलकर्णी,मोतीलाल पाटील,डॉ. विश्वासराव पाटील,डी.टी.वळवी यांनीही विचार व्यक्त केले.
ज्येष्ठ कवी अरुण राठोड यांनी शिक्षकांच्या प्रती आपल्या भावना स्वरचित कवितेतून व्यक्त केल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविणा कुलकर्णी व प्रतिभा बोरसे यांनी तर आभार प्रा.संपत कोठारी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी गायत्री सोलंकी,सुरभी बोरसे,रिद्धीका सोलंकी व सन्मित्र क्रीडा मंडळाचे संचालक यांनी परिश्रम घेतले.या वितरण सोहळ्याला तालुका शिक्षण विभागातील अधिकारी,कर्मचारी वर्ग,शाळेतील सहकारी शिक्षक, पुरस्कारित शिक्षकांचे कुटुंबीय आणि शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक,शिक्षिका पुढील प्रमाणे-शिवाजी सखाराम महाले-जि.प.खेडकोचरा,मेघा नवल जगताप-व्हाॅलंटरी प्राथमिक महिला मंडळ शाळा,नरेंद्र गोरख गुरव-सर्वोदय विद्यालय प्रकाशा,वर्षा विलास दीक्षित-महावीर इंग्लिश मीडियम स्कूल,मोहन हरिश्चंद्र सोनार-मुन्सिपल इग्लिश स्कूल,रत्नाकांत छोटूराम भोईटे-जि.प.शाळा सुलवाडे,फरजाना ताजुद्दीन पिंजारी-मिशन इंग्लिश स्कूल, मलोणी,धर्मेंद्र दामोदर तांबोळी-वसंतराव नाईक हायस्कूल,रमेश भोजूसिंग गिरासे-जि.प.शाळा शेल्टी,राकेश सुरेश जोशी-माध्यमिक विद्यालय, इस्लामपूर,अकरम फरोग अन्सारी अहमद-निशांत हायस्कूल,रविंद्र मोहन बडगुजर-जि.प.शाळा घोडलेपाडा.सुनयना सतिश निकम-श्रीमती लाडकोरबाई प्राथमिक शाळा,ललित एकनाथ बोरसे-जि.प.शाळा मलोणी,अब्दुल रऊफ अब्दुल कादिर अन्सारी-सर सैय्यद उर्दू गर्ल्स स्कूल,विजया खंडू शिवदे-न.पा.प्राथमिक शाळा क्रमांक-1,भरत वनसिंग वळवके.जि.प.शाळा राणीपुर,मनोहर रघुनाथ पाटील-माध्यमिक विद्यालय गोगापुर,वंदना रमेश पाटील-माध्यमिक विद्यालय बिलाडी त.सा,उल्लेखनीय कार्य पुरस्कार-नयना किशोर पाटील-व्हाॅलंटरी कला, वाणिज्य,विज्ञान ज्युनिअर कॉलेज,खान अबरार खान अफजल-वसंतराव नाईक हायस्कूल शहादा.