नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील 31 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया अक्कलकुवा तहसील कार्यालयात सुरू आहे. नामनिर्देशन भरण्याच्या शेवटच्या दिवशी तालुक्यातील पेचरीदेव ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच व सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे त्यामुळे शिवसेनेने एक ग्रामपंचायत बिनविरोध करुन निवडणूकीवर आपले वर्चस्व राखले आहे.
28 नोव्हेंबर पासून तालुक्यातील 31 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र स्वीकारले जात होते. नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याच्या अंतिम दिवशी तालुक्यातील पेचरीदेव ग्रामपंचायतीचे थेट लोकनियुक्त सरपंच पदासह सर्व सात उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मागील निवडणुकीत शिवसेनेने जिल्हा प्रमुख आमदार आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वाखाली कोयलीविहीर ग्रामपंचायत बिनविरोध राखली होती.त्यानंतर लगेच होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आमदार आमश्या पाडवी यांनी या निवडणुकीत देखील आपला करिष्मा कायम ठेवत पेचरीदेव ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते.
त्यानुसार पेचरीदेव ग्रामस्थांनी सामंजस्याने निर्णय घेत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंत हुरजी वसावे यांची बिनविरोध निवड केली आहे. त्यांच्यासोबत मैनाबाई नरपत वसावे,आसाराम सोना वळवी, मालतीबाई अभिमन वसावे, लीला गोविंद वसावे, जीवनदास पारत्या वसावे, काथुडीबाई दीपक वसावे, महेश संपत वसावे या सात सदस्यांची देखील बिनविरोध निवड झाली आहे.
संध्याकाळी या उमेदवारांच्या विरोधात कोणीही नामनिर्देशन पत्र सादर केले नसल्यामुळे ही निवड बिनविरोध झाली आहे. यावेळी शिवसैनिकांनी संपर्क कार्यालयाच्या बाहेर फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला .या निवडणुकीत देखील शिवसेनेने एक ग्रामपंचायत पुन्हा बिनविरोध करुन निवडणुकीवर आपले वर्चस्व राखले आहे.
नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशीच तालुक्यातील बिनविरोध झालेल्या पेचरीदेव ग्रामपंचायतीचे नव निर्वाचित सरपंच व सदस्यांचा शिवसेना संपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला.
सरपंच वसंत हुरजी वसावे तयांच्यासोबत मैनाबाई नरपत वसावे,आसाराम सोना वळवी, मालतीबाई अभिमन वसावे, लीला गोविंद वसावे, जीवनदास पारत्या वसावे, काथुडीबाई दीपक वसावे, महेश संपत वसावे या सात सदस्यांचा जिल्हा संपर्क कार्यालयात जिल्हाप्रमुख तथा आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांना पेढे भरुन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसैनिकांनी कार्यालयाच्या बाहेर फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला.यावेळी समाज कल्याण सभापती शंकर पाडवी,जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले,तालुका प्रमुख मगन वसावे,माजी सरपंच जी.डी.पाडवी,अश्विन तडवी आदी उपस्थित होते.