नंदुरबार । प्रतिनिधी
१६ गुन्ह्यात फरार आंतरराज्यीय गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंदोर येथुन अटक केली असुन ६ अतिरीक्त घरफोडीचे गुन्हे उघड करण्यात यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मागील काही दिवसांपासुन नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहर, उपनगर, शहादा, तळोदा पोलीसठाणे हद्दीत घरफोडी व इतर चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने सामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी मासिक गुन्हे बैठकीत चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करुन गुन्ह्यातील सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले.
वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या चोरीच्या पध्दतीचा अभ्यास, करुन वारंवार चोरी होणारे ठिकाण, चोरीची पध्दत यांची इत्यंभूत माहिती घेवुन रेकॉर्डवरील, मालमत्तेविरुध्दच्या गुन्ह्यातील जेलमधुन सुटुन आलेल्यागु न्हेगारांवर पाळत ठेवून होते. तसेच आपले बातमीदारांमार्फत देखील माहिती काढत होते.
पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळालीकी, तळोदा, शहादा, म्हसावद व सारंगखेडा 7 परीसरातील दुकानांचे शटर उचकावून चोरी करणाऱ्या टोळीतील एक सदस्य नवलसिंग ऊर्फ ठाकुर मध्य प्रदेश राज्यातील इंदौर शहरातील चौत्राम मंडीच्या मागे त्याच्या मुलाच्या घरी राहात असल्याची अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीसनिरीक्षक किरणकुमार खेडकर यांना कळवून स्थानिक गुन्हे शाखेचे तात्काळ एक पथक तयार करुनबातमीची खात्री करून तात्काळ संशयीत इसमास ताब्यात घेवून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेश राज्यातील इंदौर शहर गाठून तेथे चौत्राम मंडीच्याप रिसरात नवलसिंग ऊर्फ ठाकुर याचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु आरोपी हा अत्यंत चालाख असुनस्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यापूर्वी ३ वेळा गुंगारा देण्यात यशस्वी झाला होता. तो सहज कोठे बाहेर येत नाहीत व आपले अस्तित्व लपवून वेषांतर करुन फिरत होता. त्यामुळे त्यास ओळखणे देखील कठीण झाले होते. नमुद आरोपी हा चौत्राम मंडीच्या समोर असलेल्या गुरुद्वार येथे येणार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास निदर्शनास आल्याने पथकाने गुरुद्वारा बाहेर सापळा लावला. आरोपी गुरुद्वारामध्ये जात असतांना त्यास पोलीस आल्याचा संशय आल्याने त्याने तेथुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पथकाने लावलेला सापळा मजबुत असल्याने नवलसिंग ऊर्फ ठाकुर जुवानसिंग ऊर्फ जवानसिंग भुरीया वय-४० रा. नाहवेल, पोलीस ठाणे बाग ता. कुक्षी जि. धार मध्य प्रदेश याला ताब्यात घेण्यात आले.
संशयीत आरोपीतास विचारपूस केली असता त्याने मागील एक ते दिड वर्षात त्याच्या साथीदारांच्या मदतीने तळोदा शहरात रात्रीच्यावेळी दुकानांचे शटर व घरांचे कुलुप तोडून घरफोडी केल्याचे सांगितले. म्हणून संशयीत आरोपी नवलसिंग भुरीया यास तळोदा शहरात घेवून जावून सदर ठिकाणांची खात्री केली केली असता, त्याबाबत तळोदा पोलीस ठाण्यात ६ घरफोडीचे गुन्हे उघड झाले आहेत. तसेच स्थानिक गुन्हे शाखेने यापूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, म्हसावद, सारंगखेडा, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील सराफ व्यावसायीक, किराणा दुकानांचे शटर उचकावून चोरी करणारी टोळी पकडून १६ गुन्हे उघड केले होते,
त्या गुन्ह्यांमध्ये देखील नवलसिंग ऊर्फ ठाकुर जुवानसिंग ऊर्फ जवानसिंग भुरीया हा फरार होता. ताब्यात घेण्यात आलेला नवलसिंग ऊर्फ ठाकुर जुवानसिंग ऊर्फ जवानसिंग भुरीया याच्याविरुध्द् महाराष्ट्रातील सातारा, रत्नागिरी जिल्ह्यात व गुजरात, गोवा, मध्य प्रदेश राज्यात एकुण २६ गुन्हे दाखल आहेत. नवलसिंग ऊर्फ ठाकुर जुवानसिंग ऊर्फ जवानसिंग भुरीया यास गुन्ह्याच्या पुढील तपासकामी तळोदा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीताकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, असे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उप निरीक्षक अनिल गोसावी, पोलीस हवालदार मुकेश तावडे, पोलीस नाईक सुनिल पाडवी, बापू बागुल, मोहन ढमढेरे, पोलीस अंमलदार रामदास माळी यांच्या पथकाने केली आहे.