नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली येथे जिल्हा पोलीस दलातर्फे छापा टाकत ४२ लाख रुपये किमंतीची बेकायदेशीर विदेशी दारु जप्त केली आहे.याप्रकरणी दोंघाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी संपुर्ण नाशिक परिक्षेत्रात अवैध दारु तस्करांची माहिती काढुन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे व अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी त्याबाबतचे आदेश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना निर्देश दिले होते.
दि.४ डिसेंबर रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील कोपर्ली गावातील इलेक्ट्रीक सबस्टेशनच्या पुढे मोठी भिलाटीत एक पत्र्याचे दरवाजा असलेले व हाफ लोखंडी शटर असलेले बंद घरात बेकायदेशीर अवैध देशी विदेशी दारुचा साठा करुन ठेवलेला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी सदर माहिती अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांना कळविली व त्यांनी स्वत: सोबत नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार व नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पथकाने कोपर्ली गावात जावून कोपर्ली गावातील इलेक्ट्रीक सबस्टेशनच्या पुढे मोठी भिलाटीत एक पत्र्याचे दरवाजा असलेले व हाफ लोखंडी शटर असलेले बंद दिसल्याने घर मालक प्रल्हाद मधु पवार रा. कोपर्ली ता.जि. नंदुरबार याच्या घराचे कुलुप उघडून पाहिले असता घरात खाकी रंगाचे खोके आढळून आले.
सदरचे खोके उघडून पाहिले असता त्यात दारु आढळून आली, यावेळी ९ लाख ६० हजार रुपये किमंतीचे क्लासीक व्हिस्कीचे एकुण २०० खोके, एका खोक्यामध्ये १८० एम.एल. चे ४८ बाटल्या अशा एकुण ९६०० बाटल्या,१९ लाख २० हजार रुपये किमंतीचे रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्कीचे एकुण ४०० खोके, एका खोक्यामध्ये १८० एम.एल. चे ४८ बाटल्या अशा एकुण १९,२०० बाटल्या.१३ लाख २० हजार रुपये किमंतीचे रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्कीचे एकुण २०० खोके, एका खोक्यामध्ये ७५० एम.एल. चे १२ बाटल्या अशा एकुण २४०० बाटल्या असा एकुण ४२ लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल प्रल्हाद मधु पवार याच्या घरात मिळून आल्याने त्यास सदरची विदेशी दारु कोठून आणली ?
याबाबत विचारले असता त्याने सदरची विदेशी दारु सतु भिल ऊर्फ सत्तार ठाकरे रा. म्हसावद ता.शहादा याची असल्याबाबत सांगितल्याने सदरचा मुद्देमाल जप्त करुन नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात प्रल्हाद मधु पवार रा. कोपर्ली ता.जि. नंदुरबार, सतु भिल ऊर्फ सत्तार ठाकरे रा. म्हसावद ता. शहादा यांच्याविरूध्द नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार उप विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोलीस उप निरीक्षक कमलाकर चौधरी, पोलीस नाईक राजु गावीत, साहेबराव जाधव, राजेंद्र धनगर, चुनिलाल वसावे, पोलीस अंमलदार सचिन सैंदाणे, करणसिंग वळवी, महिला पोलीस अंमलदार गीता लोहार यांच्या पथकाने केली आहे.