नवापूर l प्रतिनिधी
दिल्ली येथे अत्यंत क्रूरपणे घडलेल्या श्रध्दा वालकर हत्याकांड प्रकरणाचा निषेधार्त सकाळी दहाला शहरातील गणपती मंदीरा पासुन समस्थ हिंदु समाजातर्फे मुक् मोर्चा काढण्यात आला.
मुक् मोर्चा श्री गणपती मंदीरा पासुन सुरुवात करत मोर्चा सरदार चौक, शिवाजी रोड, कुंभारवाडा, महात्मा गांधी पुतळा, लिमडावाडी, लाईटबाजार या मार्गाने फिरुन तहसिल कार्यालयाच्या आवारात सांगता करण्यात आली. तहसिलदार, पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
निवेदना मध्ये म्हटले आहे की, राजधानी दिल्ली येथे अत्यंत क्रूरपणे घडलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाचा आम्ही नवापूर सकल हिंदु समाजच्या वतीने निषेध नोंधवत आहेत. श्रद्धा हिला ज्या प्रकारे क्रूरपणे ठार मारण्यात आले त्याने संपूर्ण समाजात प्रचंड रोष आहे, महिला व पालक चिंतेत व भयभीत आहेत, सदर घटना फक्त जघण्य अपराध नसून लव्ह जिहादचे षडयंत्र आहे, आणि दिवसोंदिवस अश्या या घटना संपूर्ण देशात व आपल्या तालुक्यात, नवापूर शहरात व परिसरात पण वाढत आहे. मुळात लव्ह जिहादचे बरेच प्रकार आपल्या तालुक्यात सुद्धा घडले आहेत, महिला भगिनींना प्रेमजाळात फसवून बळजबरी धर्मांतर करण्याचे षडयंत्र काही असामाजिक तत्व करतात. त्यांना मदत करणारी टोळी सक्रिय असते. आपल्या तालुक्यात ही अश्या घटना घडवून आणणाऱ्या असामाजिक तत्वांवर लक्ष केंद्रित झाले पाहिजे,
महिला भगिनींच्या छेडती आणि रोड रोमियो बद्दल झालेल्या तक्रारी बाबत प्रशासनाने योग्य वेळी अत्यन्त तातडीने गांभीर्याने कार्यवाही केली पाहिजे. शाळा, कॉलेज आणि तत्सम परिसरात करडी नजर ठेवली पाहिजे, जेणे करून अश्या घटनांना आळा बसेल, लव्ह जिहाद या विषयावर त्वरित कायदा करून हिंदू तरुणींवर होणारा छळ कुठे तरी थांबला पाहिजे, शासनाला निवेदन करू इच्छितो की लव्ह जिहाद या समस्येवर शासनाने कडक कायदा बनविला पाहिजे. हत्याकांड घडवणाऱ्या अपराध्यास अत्यंत कडक शिक्षा
मिळावी अशी आमची मागणी आहे.

निवेदनावर हिंदु समाजाचे राजेंद्र गावीत, दर्शन पाटील,जितेंद्र अहिरे,किरण टिभे,नगराध्यक्षा सौ हेमलता पाटील,नगरसेवक महेंद्र दुसाने, विशाल सांगळे,हंसमुख पाटील,अनिल वारुडे,राहुल मराठे,संदिप पाटील,घनश्याम परमार, निलेश प्रजापत, माजी नगरसेविका सुनिता वसावे,जिग्नेशा राणा ,हेमंत शर्मा,शंभू सोनार,अजय अग्रवाल सह असंख्य हिंदु समाजाचे पुरुष महिला यांच्या सह्या आहेत.

यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ,उपनिरीक्षक अशोक मोकळ,मनोज पाटील,अ.स.इ विकास पाटील,निजाम पाडवी,विनोद पराडके,कैलास तावडे,रणजीत महाले सह पोलिस कर्मचारी यांनी चोख बंदोबस ठेवला होता.