नंदुरबार | प्रतिनिधी
जि. प. शाळा ठाणाविहीर व जि. प. शाळा विरपुर यांच्या संयुक्त विद्यमाने वाण्याविहीर ता.अक्कलकुवा केंद्राची शिक्षण परिषद ठाणाविहीर येथे संपन्न झाली.
अक्कलकुवा तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी मंगेश निकुंभ यांच्या प्रमुख उपस्थितीत व वाण्याविहीर केंद्राचे केंद्रप्रमुख मोहन बिस्नारीया यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी ठाणाविहीर गावचे लोकनियुक्त सरपंच मानसिंग वळवी होते .शा.व्य.स. अध्यक्ष शंकर कोठारी, शा.व्य.स. सदस्य शांताराम नाईक, ज्ञानप्रकाश फाउंडेशनचे भावेश मोरे, श्रीमती सोनाल शिंदे, श्री.कुंभकर्णी, देवमोगरा शाळेचे पदोन्नती मुख्याध्यापक दिनेश पाडवी, भाबलपुर शाळेच्या पदोन्नती मुख्याध्यापक श्रीमती संगीता पवार, यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाळेच्या वतीने सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात आले, जि प शाळा ठाणाविहीर येथील श्रीमती अंजना कलाल यांनी विद्यार्थ्यांसमवेत संगीतमय ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले ,यासाठी विद्यार्थी व शिक्षिका यांचे उपस्थितांनी कौतुक केले.शिक्षण परिषदेमध्ये गटशिक्षणाधिकारी निकुंभ यांनी आपल्या मनोगतात गुणवत्ता विकासाबाबत मार्गदर्शन केले ,तसेच मार्गदर्शक सूचना दिल्या, प्रशासकीय कामकाजाबाबत सूचना दिल्या. तुषार पाटील यांनी मागील शिक्षण परिषदेचा आढावा घेतला सांख्यिकी माहितीच्या आधारे विविध स्तरावरील केंद्राचे स्थान त्यांनी अधोरेखित केले.
श्रीमती सुनंदा भावसार यांनी विद्यार्थी संख्येने गुणवत्ता विकासातील महत्त्व यावर प्रकाश टाकला, सूक्ष्म नियोजनाद्वारे विद्यार्थी सर्वांगीण विकास साधता येतो, हे त्यांनी विशद केले. श्रीमती सोनल शिंदे व भावेश मोरे यांनी गुणवत्ता विकासात मूलनिहाय नियोजन व पैलू याबाबत मार्गदर्शन केले.
यु-डायस प्लस पी.जी.आय. व समावेषित शिक्षणाबाबत बालाजी केंद्रे यांनी माहिती दिली,शंकांचे निरसन केले.श्रीमती नंदा पवार यांनी माता पालक गट बाबत माहिती दिली, लिडर माता यांची भुमिका व कार्य यांवर त्यांनी प्रकाश टाकला. प्रदिप शिंपी यांनी शिष्यवृत्ती परीक्षा संपूर्ण प्रक्रिया , यशस्वी विद्यार्थी यशोगाथा विशद करून सदरील विषयावर चर्चा घडवून आणली.केंद्रप्रमुख मोहन बिस्नारीया यांनी केंद्रातील विविध स्तरावरील गरजांचा विषय निहाय आढावा घेऊन, केंद्रातील प्रशासकीय कार्य, प्रशासकीय कार्याबाबत माहिती दिली.
जि प शाळा ठाणाविहीर शाळेचे मुख्याध्यापक हरिश्चंद्र वळवी,जि प शाळा विरपुर मुख्याध्यापीका श्रीमती.ललिता पाटील, सुरेश गायकवाड, दिलवरसिंग पाडवी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जगदीश धसे यांनी केले तर आभार प्रदर्शन नितीन नेरकर यांनी केले.शेवटी वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.