नंदुरबारl
नंदुरबार-दोंडाईचा रस्त्यावरील घोटाणे गावाजवळ चारचाकी वाहन उलटल्याने तरुण ठार झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, चेतक राजपूत याने त्याच्या ताब्यातील चारचाकी वाहन (क्र.एम.एच.१५ जीव्ही १७५७) घेवून नंदुरबार-दोंडाईचा रस्त्याने जात होते. यावेळी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालवून घोटाणे गावाजवळ अपघात झाल्याने.
चेतक राजपूत याच्या बाजूला बसलेला तरुण करण गोरख राजपूत रा.राकसवाडे ता.नंदुरबार हा ठार झाला. तसेच वाहनाचेही नुकसान झाले. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत भटू रजेसिंग राजपूत यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात चेतक राजपूत याच्याविरोधात भादंवि कलम ३०४(अ), २७९, ३३७, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४, १३७/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.देविदास नाईक करीत आहेत.