नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरातील नवीन महादेव मंदिर येथे चोरट्यांला रंगेहात पकडण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि 2 डिसेंबर रोजी एक भिक्षुकाच्या वेशात असलेल्या चोरट्याने नवीन महादेव मंदिरातील दान पेटी असलेला डब्बा लंपास केला होता. सदर चोरी CCTV कॅमेरात कैद झाली असल्याने मंदिर परिसरातील नागरिक सकाळी चोरट्याला शोधात होते.
सकाळी 10 ते 11 वाजे दरम्यान पुन्हा चोरट्याने मंदिरात प्रवेश करताच स्थानिक नागरिकांनी त्याला रंगेहात पकडले. स्थानिकांचा रोष बघता चोरट्याला चांगलाच चोप देण्यात आला व पोलिसाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.