नंदुरबार | प्रतिनिधी
एस.ए.एम ट्रस्ट,नंदुरबार संचलित एस.ए.मिशन हायस्कूल डॉ. राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या जयंती निमित्ताने शिक्षक दिवस साजरा करण्यात आला .
याप्रसंगी संस्थेचे चेअरमन रेव्हरंड जे.एच. पठारे, कार्यकारी संचालक डॉ. राजेश वळवी, शाळेच्या प्राचार्या नूतनवर्षा वळवी व उपमुख्याध्यापक व्ही आर पवार, पर्यवेक्षक मीनल वळवी, सी.पी बोरसे, पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा, ज्येष्ठ शिक्षक ए.आर.गर्गे, एल.एस.पानपाटील, यु.एस.मोरे,व्ही.एम.नाथानी आदी मान्यवर उपस्थित होते .कार्यक्रमाच्या सुरवातीस डॉ. राधाकृष्ण सर्वपल्ली यांना अभिवादन करण्यात आले,
ह्या वेळी शिक्षक दिवसानिमित्त विद्यार्थ्यांनी आणलेला केक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कापण्यात आला.ह्या वेळी संस्थेचे चेअरमन रेव्ह.जे.एच.पठारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना आपल्या बालपणी असलेल्या शिक्षकांच्या आठवणी विद्यार्थ्यांसमोर मांडल्या तसेच संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. राजेश वळवी यांनी आपल्या कार्यकाळात लाभलेल्या गुरूंचे अनुभव व महत्त्व आपल्या मनोगतात सांगितले, यावेळी सर्व शिक्षकांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुलाबाचे रोपटे देऊन गौरविण्यात आले, तर शाळेच्या शिक्षिका पी.एम.गोसावी यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमा प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्कूल थीम वर डान्स व राकेश पवार या विद्यार्थ्याने सोलो गीत सादर केले. तसेच हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.आणि मृणाल राठोड व प्रणिती पराडके,व ज्युनिअर कॉलेज चे विद्यार्थिनी करीना व अलीना बीजू यांनी शिक्षक दिनावर उत्कृष्ट भाषण सादर केले. पुरुष शिक्षकांकरिता मनोरंजनात्पर बॉल बॅलन्सिंग खेळाचे आयोजन करण्यात आले यावेळी शिक्षक दिनानिमित्त, शिक्षकांनी सुंदर व आकर्षक रांगोळ्या व सेल्फी स्टँड तयार केले. तर विद्यार्थ्यांनी छान ग्रीटिंग कार्ड तयार करून उत्तम सजावट केली होती. व कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून फराळ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुनिता शिंदे यांनी केले. तर आभार प्रदर्शन व्ही. आर. पवार केले.