नंदुरबार l
येथे संसदिय संकुल विकास परियोजना अंतर्गत आस्था फाऊंडेशन व रिसर्चट सेंटर यांच्या वतीने संसदिय संकुल परियोजना कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यालयामार्फत शासनाच्या विविध योजनांची माहिती देवुन जनजागृती करण्याचे काम होईल.
नंदुरबार शहरातील धुळे रस्त्यावरील अंबिका शोरुमच्या वरील मजल्यावर संसदिय संकुल परियोजना कार्यालय सुरु करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन भाजपाचे राष्ट्रीय संघटन महामंत्री व्ही.सतिश यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
याप्रसंगी आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित, खा.डॉ.हिना गावित, योजक संस्थेचे डॉ.गजानन डांगे, संसदिय योजनेचे राष्ट्रीय समन्वयक अनिल वलसनकर, आस्था फाऊंडेशन रिसर्च सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भापकर, उद्योगपती हस्तीमल जैन, माजी उपनगराध्यक्ष श्यामबापू मराठे, नगरसेवक आनंदा माळी, लक्ष्मण माळी, संजय वनकर, सुनिल तंवर, पत्रकार योगेंद्र दोरकर, शरद भदाणे, संजय शाह, श्री वाडीले आदी उपस्थित होते.








