नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य वारकरी साहित्य परिषदेच्या नंदुरबार तालुकाध्यक्षपदी हभप.मधुकर दौलत चौधरी यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल हभप सद्गुरु भजनी मंडळ व नागरीकांच्या वतीने हभप.मधुकर चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य वारकरी साहित्य परिषदेच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात संत वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार तालुकाध्यक्षपदी हभप.मधुकर दौलत चौधरी यांची निवड करण्यात आली.
ही निवड झाल्याबद्दल हभप.मधुकर चौधरी यांचा हभप सद्गुरु भजनी मंडळ यांच्यासह स्वप्निल विहार, विनय विहार, पवन विहार, शनिछाया नगर, रामगड नगरातील रहिवाश्यांनी सत्कार केला. याप्रसंगी हभप सद्गुरु भजनी मंडळाचे अध्यक्ष संतोष ठाकूर, अनिल पाटील, दीपक पाटील, आबा पाटील, माधवराव माळी, रामकृष्ण मलक, अनिल पाटील टिटाणेकर, नंदकिशोर पाटील, हिरालाल चव्हाण, गजानन सुर्वे, आनंदा पाटील, राहुल पाटील, चेतन राजपुत, गणेश पाटील, हर्षल मराठे, माजी सैनिक राजेंद्र ठाकूर यांच्यासह रहिवाशी उपस्थित होते.








