म्हसावद l प्रतिनिधी
जिल्हा क्रीडा विभाग नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने शहादा तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन मंदाणे येथील आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात पार पडल्या.त्यात मंदाणे येथील आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या १४,१७ व १९ वयोगटातील खेळाडूंनी दमदार कामगिरी बजावत सालाबादाप्रमाने आपले वर्चस्व पुन्हा कबड्डी खेळात सिद्ध करत यशाची परंपरा कायम ठेवलीे.
सविस्तर,शहादा तालुका कबड्डी स्पर्धा नुकत्याच मंदाणे येथील आदर्श विद्यालयात घेण्यात आल्या.स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य चंदन पवार यांच्या हस्ते करण्यात आले.तालुका क्रीडा संयोजक भालचंद्र पाटील,घनश्याम पाटील,युवराज राठोड,जी.आर.पाटील,राकेश पाटील,के. बी.पाटील,शेखर लहामगे, अभिजित साळुंके,नितीन पाटील,रमेश बिरारे आदी क्रीडा शिक्षक उपस्थित होते.स्पर्धेत मंदाणे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील १४ वर्ष मुली,१७ वर्ष मुलं व मुली,१९ वर्ष मुलं व मुली अशा एकूण ५ संघांनी विजेतेपद मिळवून उत्कृष्ट प्रदर्शन करीत कबड्डी खेळावर यावर्षी पुन्हा वर्चस्व सिद्ध केले.सर्व पाचही संघांची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत निवड झाली.
स्पर्धेसाठी पंच म्हणून सहभागी सर्व शाळेतील क्रीडा शिक्षकांनी,अभिजीत साळुंखे,धीरज कुंवर,गोपाल पावरा आदींनी काम पाहिले.स्पर्धा यशस्वीतेसाठी सर्व क्रीडा शिक्षक,मंदाणे विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,विध्यार्थी आदींचे सहकार्य लाभले.यश संपादन करणाऱ्या खेळाडूंना क्रीडा शिक्षक पंकज पवार,महेंद्र पवार,प्रशिक्षक प्रा.दिनेश पवार,दत्तात्रय साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले.सर्व खेळाडूंचे,क्रीडा शिक्षकांचे, प्रशिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा.जे.टी.पवार,उपाध्यक्ष सत्तरआप्पा पवार,सर्व संचालक मंडळ,प्राचार्य चंदन पवार,पर्यवेक्षक एम.जी.पाटील,सर्व शिक्षक,शिकेतर कर्मचारी,पालक वर्ग व ग्रामस्थांनी कौतुक केले.








