नवापूर l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ परिवर्तन पॅनलने श्री. गणपती मंदीरात भाजपचे तालुका अध्यक्ष भरत गावीत यांनी विद्यीवत पुजन व श्रीफळ फोडुन केले.यानंतर डोकारे येथील देवमोगरा मातेचा मंदीरात माजी आमदार शरद गावीत व भाजप चे तालुका अध्यक्ष भरत गावीत यांनी विद्यीवत पुजन करुन व श्रीफळ फोडुन प्रचाराचा शुभारंभ केला.
यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावीत, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख, उमेदवार संगिता गावीत, बकाराम गावीत,हरिदास गावीत,देवराम गावीत,लक्ष्मण कोकणी,जगन कोकणी,सिताराम ठाकरे,रमेश राणा,मिराबाई गावीत,आलु गावीत,रमेश गावीत,रावजी वळवी,सरोदाबाई वसावे, नगरसेवक महेंद्र दुसाने,तालुका सरचिटणीस जयंतीलाल अग्रवाल,दिलीप गावीत,धनंजय गावीत,जयवंत जाधव सह शहरातील व तालुक्यातील भाजचे पदधिकारी नवनिर्वाचित सरपंच व ऊसउत्पादक शेतकरी मोठया संख्यने उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना परिवर्तन पॅनलचे मुख्य मार्गदर्शक भरत गावीत यांनी सांगितले की, आदीवासी सहकारी साखर कारखाना मनमानी कारभाराने चालविला जात होता.कारखाना उभारणीसाठी ज्यांनी मदत केली तशा लोकांना विसरुन परिवार वादाने संचालक मंडळ तयार करुन सत्तेचा दुरुपयोग केला.त्यामुळे कारखाना डबगाईत जाऊन शेतकरी वर्गाला न विचारता कारखाना भाड्याने द्यावा लागला.ही शोकांतीका आहे.आम्हाला निवडुन दिले तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा सर्व योजना मिळुन देऊन त्यांच्यावर झालेला अन्याय दुर करण्यासाठी आम्ही परिवर्तन घडविण्यासाठी निवडणुका लावल्या आहेत.२५ वर्षात पहिल्यादा निवडणुका होत असल्याने सभासदान मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे कारखाण्यात परिवर्तन नक्कीच घडले असा आम्हाला विश्वास आहे.
जिल्हाचे पालकमंत्री ना.डॉ विजयकुमार गावीत,खासदार डॉ हिना गावीत,जि.प अध्यक्षा डॉ सुप्रिया गावीत,माजी आमदार शरद गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या आर्शिवादाने आम्ही सर्वचा सर्व उमेदवार निवडणुन येऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळुन देऊ असा विश्वास दिला.
५ वर्षात पहिल्यादा साखर कारखाण्याची निवडणुक होत असल्यामुळे तालुका भरातील राज्यकीय वातावरण ढवळुन निघाले आहे.जर साखर कारखाना निवडणुकीत परिवर्तन घडले तर तालुक्यातील आगामी सर्व निवडणुकांवर परिणाम होणार आहे त्यामुळे या निवडणुकीकडे सर्व राजकीय लोकांचे लक्ष लागले आहे.