नंदुरबार | प्रतिनिधी
नवापूर शहरातील अमन पार्कजवळ शुल्लक कारणावरूण तिघांवर तलवारीने वार करुन जिवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर शहरातील अमन पार्कजवळ दि.१८ रोजी इरखान शेख याची पत्नी शबुक्ता हिचे व त्यांच्या शेजारी राहणारी हुमेरा यांच्या झालेल्या भांडणात एकमेकांना शिवीगाळ करीत असतांना साक्षीदार रुकसारबानो आसिफ बलोची यांनी भांडण करुन वाईट शिवीगाळ करु नका, असे सांगितले. याचा राग आल्याने मुस्ताक मुराद मक्राणी यांनी गैरकायद्याची मंडळी जमवुन शब्बीर मुराद मक्राणी, रुकसारबानो आसिफ बलोची यांना जाकीर मुनाफ शेख, इरफान शेख, जावेद शेख व इतर चौघे अशा सात जणांनी संगनमत करुन तलवार, लाकडी, डेंगारा, लोखंडी पाईप असे घेवून लतिफ मक्राणी यांच्या घरात अनाधिकृतपणे प्रवेश करुन शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली.
तसेच जाकीय मुनाफ शेख याने फरहान रसुल शेख यांच्या पोटावर तलवारीने वार करुन जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला असता फरहन शेख यांनी संरक्षणाकरीता उजवा हात पुढे केल्याने त्यांच्या हातावर गंभीर दुखापत झाली. तसेच मुश्ताक मुराद मक्राणी व शब्बीर मुराद मक्राणी यांच्यावर यांच्यावर तलवारीने वार करुन गंभीर दुखापत केली. जावेद शेख याने लोखंडी पाईपने साक्षीदारांना मारहाण करीत घराच्या बाहेर असलेल्या दुचाकीवर तोडफोड करुन नुकसान केले व दोघा अनोळखी इसमांनी घराच्या बाहेर ठेवलेले कपाट खाली पाडून नुकसान केले.
तसेच चारचाकी वाहनातून सर्व पळून गेले. याबाबत फरहन शेख यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात भादंवि कलम ३०७, ४५२, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१-३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील करीत आहेत.