नंदुरबार | प्रतिनिधी
विसरवाडी येथे नोकरीचे आमिष दाखवून एका १८ वर्षीय युवतीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या अत्याचारा वेळी केलेल्या व्हिडीओ शुटींगचे स्क्रिन शॉर्ट युवतीच्या होणार्या पतीला पाठवून लग्न मोडण्यात आले. सदर व्हिडीओ प्रसारीत करण्याची धमकी देवून वारंवार अत्याचार करून मारहाण केल्याचाही प्रकार घडली आहे. या प्रकरणी पिडीत युवतीच्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवापूर तालुक्यातील एका अल्पवयीन १८ वर्षीय युवतीला गावातीलच जुबेर हसीनोद्दीन शेख व वहिदा शेख या दोघांनी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. या अमिषातून जुबरे शेख याने युवतीशी जवळीकता साधून तिच्यावर अत्याचार केला. या अत्याचारावेळी वहिदा शेखने मोबाईलमध्ये व्हिडीओ शुटींग केली. या व्हिडीओ शुटींगचे स्क्रीन शॉर्ट जुबेर शेख याने युवतीच्या होणार्या पतीला सोशल मिडीयावर पाठवून तिचे लग्न मोडले तसेच सदर व्हिडभ्ओ प्रसारीत करण्याची धमकी देवून वेळोवेळी अत्याचार करून हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच उर्वरीत पाच जणांनी तु जुबेरशी लग्न कर असे सांगून शिवीगाळ करीत दमदाटी केली.
याबाबत पिडीत युवतीने विसरवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जुबेर हसीनोद्दीन शेख, वहिदा शेख, दानिश, जुबरेची पत्नी, आई, वडील, भाऊ सर्व (रा.विसरवाडी) अशा एकूण ७ जणांविरूध्द भादंवि कलम ३७६, (२) (आय), ३२३, ५०४, ५०६, ३४ सह पोक्सो कलम ४ सह आयटी ऍक्ट कलम ६६ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे करीत आहेत.








